चंद्रपूर ब्रेकिंग : दोन शिक्षकांचा ट्रक खाली दबून मृत्यू : चारचाकी वाहनाचा अक्षरशः चेंदामेंदा : धान्याची वाहतूक करणारा ट्रक पालटून दबले शिक्षकांचे चारचाकी वाहन : काल रात्री उशिरा ची घटना : तळोधी येथील मुख्याध्यापकाचा समावेश #road accident - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर ब्रेकिंग : दोन शिक्षकांचा ट्रक खाली दबून मृत्यू : चारचाकी वाहनाचा अक्षरशः चेंदामेंदा : धान्याची वाहतूक करणारा ट्रक पालटून दबले शिक्षकांचे चारचाकी वाहन : काल रात्री उशिरा ची घटना : तळोधी येथील मुख्याध्यापकाचा समावेश #road accident

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : नागभीड -


नागभीड तालुक्यातील तळोधी जनकापुर जवळ काल रात्री धान्याचे पोते भरलेला ट्रक पालटून भीषण अपघात झाला अपघात झाला असून या खाली चारचाकी वाहन दबून त्यात दोन शिक्षकांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यात महात्मा फुले हायस्कूल  तळोधीचे मुख्याध्यापक गुलाबराव कामडी   व फटाले या दोन्ही शिक्षकांचे निधन झाले.

धान्याचे पोते ट्रक मध्ये भरून तळोधी वरून नागभीड कडे जात असतांना. पळसगाव जनकापूर मध्ये या गाव रस्त्यावर रोडचे काम चालू आहे तेथे जागोजागी खड्डे मोठमोठे आहेत .त्यामुळे धानाचे पोते भरलेला ट्रक हा तिथे त्याच रस्त्यावरून बाजूने शिक्षकांच्या चारचाकी वाहन जात असताना त्यावर पलटी झाला त्यामुळे जागीच त्या चारचाकी वाहनात असलेले शिक्षकांच्या मृत्यू झाला. 
महात्मा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य गुलाबराव कामडी व जेष्ट सहायक शिक्षक श्री.दादाजी फटाले यांचे कालया दोन्ही गणमान्य शिक्षकवृंदाच्या निधन वार्तने परिसरात शोककळा पसरली आहे.काल रात्री ११-३० वा. नागभिड तालुक्यातील महामार्गावरील सावरगाव गावालगत स्तताचे चारचाकी वाहनाने तळोधीकडे परततांना ही दुःखद घटना घडली.

या अपघाताचे वृत्त समजताच परिसरात शोककळा पसरली आहे.पोलिस ठाणे नागभिड येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार गोतमारे यांचे मार्गदर्शनात सुरू आहे. .