मजूर बेरोजगारांनाना तात्पुरती शिधापत्रिका वाटप : सुदर्शन निमकर यांच्या मागणीची प्रशासनाने घेतली दखल; शासनाकडून मिळणार अन्नधान्य #Rashancard #COVID-19 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

मजूर बेरोजगारांनाना तात्पुरती शिधापत्रिका वाटप : सुदर्शन निमकर यांच्या मागणीची प्रशासनाने घेतली दखल; शासनाकडून मिळणार अन्नधान्य #Rashancard #COVID-19

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा : 


शहरासह तालुक्याच्या अन्य भागात स्थानिक, बाहेर जिल्ह्यातून, राज्यातून मजुरीकरिता आलेल्या गरीब मजुरांना कोरोना संसर्गामुळे करण्यात आलेल्या लॉक डाऊनमुळे उपासमारीची वेळ आल्याने अश्या मजुरांना शासनाने तात्काळ तातपूर्ती शिधापत्रिका देऊन त्यांना अन्नधान्य देण्याची मागणी निवेदनातून तहसीलदार राजुरा यांच्याकडे केली होती, याची तालुका प्रशासनाने दखल घेत तहसीलदार डॉ. रवींद्र होळी यांनी तातपूर्ती शिधापत्रिका वाटप करणे सुरू केले आहे.यामुळे शेकडो स्थानिक, बाहेर जिल्ह्यातील, राज्यातील शिधापत्रिका नसलेल्या मजुरांना शासनाची मदत मिळणार असल्याने दिलासा मिळाला आहे.

राजुरा तालुक्यात मोठ्याप्रमाणात उद्योगधंदे असल्याने मजूरवर्ग पोट भरण्यासाठी येत आहे, परंतु कोरोना संसर्ग यामुळे लॉक डाऊन असल्याने गरीब मजूर वर्गाने मजुरीकरिता घराबाहेर जाता येत नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. यामध्ये स्थानिक मजूर वर्ग व परप्रांतीय मजूर वर्ग आहे परंतु त्यांच्याकडे स्वस्त धान्य दुकानदारांकडून घेण्यासाठी शिधापत्रिका नसल्यामुळे ते महाग अन्नधान्य घेऊ शकत नासल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

असेच राजुरा येथील डोहेवाडी लगतच्या परिसरात छत्तीसगढ येथून आलेल्या मजूर वर्गांना लॉक डाऊन मुळे उपास्मरीची वेळ आली होती, सदर बाब सुदर्शन निमकर यांना माहीत होताच त्यांच्याच संस्थेअंतर्गत असलेल्या प्रियदर्शनी विद्यालय रामुपर यांनी तीन क्विंटल धान्याची मदत निमकर यांच्या हस्ते केली. 

अश्या गरीब मजुरांना शासनाने तात्पुरती शिधापत्रिका देऊन धान्याची मदत करण्याची मागणी तहसीलदार राजुरा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. या मागणीची प्रशासनाने दखल घेत डॉ. रवींद्र होळी यांनी तात्काळ तातपूर्ती शिधापत्रिका देण्यासाठी अन्नपुरवठा निरीक्षक विकाससिंग राजपूत, सोनू गंभीरे, किशोर खांडेकर याना सांगून गरीब मजुरांना शिधापत्रिका दिल्याने याचा शेकडो गरीब मजुरांना दिलासा मिळाला आहे.