राजुऱ्यातून रेस्क्यू केलेला तो रुग्ण फक्त quarantine क्वॉरंटाइन : अफवेला बळी पडून नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही : घरातच रहा -दक्षता घ्या ! #COVID-19 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

राजुऱ्यातून रेस्क्यू केलेला तो रुग्ण फक्त quarantine क्वॉरंटाइन : अफवेला बळी पडून नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही : घरातच रहा -दक्षता घ्या ! #COVID-19

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 31 मार्च 2020-


राजुरा येथील नगर परिषद तलावाच्या बाजूला असलेल्या वस्तीतून एक व्यक्ती प्रशासनाने खबरदारी खातीर रेस्क्यू केला असून या घटनेनंतर शहरात अफवांना प्रचंड उधाण आलेले आहे. 

टीम खबरकट्टा ने घेतलेल्या प्रत्यक्ष माहिती नुसार बाहेरून आलेला एक व्यक्ती गेल्या 17 मार्च पासून चंद्रपूर जिल्ह्यात व 2 दिवसापासून राजुरा येथील नगर परिषद तलावाच्या कडेला असलेल्या वस्तीतील आपल्या नातेवाईकाकडे वास्तव्यास होता. तो व्यक्ती चंद्रपूर जिल्यातील रहिवासी नसून बाहेर राज्यातून रेल्वे ने प्रवास करून अस्थायी स्वरूपात चंद्रपूर जिल्ह्यात मुक्कामी आहे.या व्यक्तीने प्रवास केलेल्या विशिष्ट डब्यातील काही रुग्ण संशयित आढळल्याकारणाने , डब्यातील सर्व व्यक्तींना प्रशासनाने विलगीकरणात निगराणीखाली ठेवले आहे.
राजुऱ्यातून रेस्क्यू केलेल्या या व्यक्तीला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज च्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे व इरांप्रमाणेच सर्व चाचण्या केल्या जातील. हे इतर बाहेरून आलेल्या प्रवाश्याना होम क्वॉरंटाइन केल्यासारखेच असून नागरिकांनी घाबरण्याचे काहीही कारण नाही असे नाव न लिहिण्याच्या अटीवर एका अधिकाऱ्याने कळविले आहे.त्यामुळे राजुरा येथील नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता आपापल्या घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. सर्व नागरिकांनी घरातच राहून सोशल डिस्टंन्सीग पाळून प्रशासनाला सहकार्य करावे.