पीकअप वाहन उलटल्याने दहा मजुर जखमी !pickup - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

पीकअप वाहन उलटल्याने दहा मजुर जखमी !pickup

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :चिमूर -नेरी 


शेतमजुरांना घेउन येत असलेले पीकअप वाहन उलठल्याने दहा मजुर जखमी झाल्याची घटना १२ मार्चला रात्री ९.४० च्या सुमारास चीमुर तालुक्यातील रेंगाबोडी गावाजवळ घडली. रेखा धनराज कोटेवार या महीलेला गंभीर दुखापत असल्याने तीला उपचारासाठी नागपुरला हलवीण्यात आले.

चना कापण्यासाठी सीदेंवाही तालुक्यातील सरडपार येथील काही मजुर हींगणघाठ तालुक्यात गेले होते .कामे आटोपल्यानंतर पीकअप वाहनाने परतताना रेंगाबोडी गावाजवळ त्यांचे वाहन उलटले .यात धनराज तुळशीराम कोटेवार वय - ५० , रेखा धनराज कोटेवार वय -४५ , मनोहर कोटेवार वय-४५ , कीसन कोटेवार वय- ५७, लता रामप्रसाद नागपुरे वय- ५७ , शांता शंकर शेंडे , वय- ४५ , कमल शेंडे वय - ६५ वर्ष , सर्व सरडपार येथील , तर पंकज महादेव दांडेकर वय - २५ रा. मांडगांव जखमी झाले आहेत.

सर्व जखमींना खडसंगी येथील प्राथमीक आरोग्य केंद्रांत भरती करण्यात आले. त्यानंतर उपजील्हा रूग्णालय चीमुर येथे पुढील उपचारासाठी भरती करण्यात आले . मात्र रेखा कोटेवार यांची प्रक्रुती गंभीर असल्याने नागपुरला रेफर करण्यात आले आहे . पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहेत.