हक्काच्या लढाईसाठी ओबीसी बांधवानी एकत्र या* = सचिन राजूरकर : ओबीसी अस्मिता रथयात्रेला सावली तालुक्यात उस्फुर्त प्रतिसाद #obcjanganana - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

हक्काच्या लढाईसाठी ओबीसी बांधवानी एकत्र या* = सचिन राजूरकर : ओबीसी अस्मिता रथयात्रेला सावली तालुक्यात उस्फुर्त प्रतिसाद #obcjanganana

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : सावली -



ओबीसी अस्मिता रथयात्रा सावली तालुक्यात आगमन झाल्यावर शहरातील महात्मा फुले यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून रथयात्रेची मुख्यमार्गाने राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांचे नेतृत्वात  सुरवात करण्यात आली.

मंडळ आयोगा नुसार देशात 3743 जाती समुह असल्याचे स्पस्ट होत आहे, सन 1931 मद्ये ओबीसी ची इंग्रजांच्या काळात जनगणना झाली तेव्हा 52% इतका जनसमूह ओबीसी प्रवर्गात समाविष्ट होता,  जर 2021 मध्ये ओबीसी ची स्वतंत्र जनगणना झाल्यास नक्कीच 70% जनसमुह ओबीसी प्रवर्गात समाविष्ट असू शकतो, या संपूर्ण ओबीसी प्रवर्गाची जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे, जनगणना झाली तरच ओबीसी प्रवर्गातील जातीचा विकास होईल, अन्यथा ओबीसी प्रवर्गातील जातीवर फार मोठा अन्याय होईल व भारत स्वतंत्र झाल्यापासून होत आहे, त्यामुळे 1 मे पासून सुरु होणाऱ्या जनगणना फार्मेट मध्ये ओबीसी चा स्वतंत्र  रकाना नसल्यमुळे संपूर्ण ओबीसी प्रवर्गात मोडणाऱ्या जनतेनी जनगणना करण्यास स्पष्टपणे नकार देऊन कोणतीही माहिती देऊ नये, यावेळी आपण सर्व ओबीसी प्रवर्गात मोडण्यात जातीने एकसंघ होऊन बहिष्कार टाकावा असे प्रतिपादन मा सचिन राजूरकर महासचिव राष्ट्रीय ओबीसी महासंघ यांनी आव्हान केले.

ओबीसी जनगणना अस्मिता रथ यात्रा 2 मार्च 2020 पासून संपूर्ण जिल्हाभर जनजागृती करण्याकरिता निघाली असून ती अस्मिता रथ यात्रा आज दि 13/3/2020 सावली  येथे आगमन होताच महात्मा ज्योतिबा फुले  यांच्या पुतळ्याला  मा सचिन राजूरकर यांचे हस्ते माल्यार्पण करण्यात आले. 

त्या नंतर नियोजित गावांना कवठी , उसेगाव, हरांबा, कापसी, व्याहाड बुज, व्याहाड खुर्द, निमगाव, अंतरगाव, निफंद्रा, गेवरा बुज, पालेबारसा व पाथरी येथे भेटी देऊन पत्रके देऊन जनगणने संदर्भात माहिती देण्यात आली सर्व ठिकानी जनतेच्या उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, त्यानंतर ठिक 7:30 वाजता बाजार चौक पाथरी येथे मा सचिन राजूरकर महासचिव राष्ट्रीय ओबीसी महासंघ यांचे अध्यक्षतेखाली मा. श्याम लेडे यांच्या  विशेष उपस्थितीत समारोपीय जाहीर सभा घेण्यात आली.

या सभेत मा. अविनाश पाल,  मा. दिनेश चिटनुरवार, डॉ. तुषार मर्लावार , मा. विजय कोरेवार सभापती, कविंद्र रोहणकर अध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघ सावली तालुका, भाऊराव कोठारे सचिव राष्ट्रीय ओबीसी महासंघ सावली, बाजार समिति सभापती हिवराज शेरकी,संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष सतीश बोम्मावार,अनिल गुरनुले,अर्जुन भोयर,किशोर घोटेकर,दिवाकर गेडाम,शोभाताई बाबनवाडे,उषाताई भोयर,पवन कवठे,विनोद धोटे प्रसिद्धी प्रमुख,आदि उपस्थित होते, तसेच या सभेला बहुसंख्ये महिला व ओबीसी बांधव उपस्थित होते.समारोप कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिनेश मोहूर्ले यांनी केले.संचलन दिलीप ठीकरे यांनी तर आभार तुकाराम ठीकरे यांनी मानले.