ओबीसी अस्मिता रथयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद. - राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा जातनीहाय जनगणनेकरीता एल्गार. - राजुरा शहरासह तालुक्यांतील ग्रामीण भागातही जनजागृती#obc. - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ओबीसी अस्मिता रथयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद. - राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा जातनीहाय जनगणनेकरीता एल्गार. - राजुरा शहरासह तालुक्यांतील ग्रामीण भागातही जनजागृती#obc.

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा ओबीसी समाजाची जातनीहाय जनगणना करण्यात यावी आणि तसे होत नसल्यास जनगणनेवर बहिष्कार घालावा या प्रमुख मागनीसह अन्य मागण्या व त्यासंदर्भात जनजागृती करण्याकरीता ओबीसी अस्मिता रथ यात्रा राजुरा शहरासह तालुक्यातील अन्य गावांमध्ये मार्गभ्रमण करून कॉर्नर सभा घेण्यात आल्या.शहरातील संविधान चौक पंचायत समिती जवडिल डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून रथ यात्रेला सुरुवात करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर ,बबनराव फंड ,मार्गदर्शक ,गणपती मोरे ,उपाध्यक्ष ,तालुका बल्लारपूर ,अरुण धोटे,नगराध्यक्ष ,नगर परिषद ,राजुरा ,रमेश नळे,विरोधी पक्ष गट नेता ,दिलीप देरकर ,नगरसेवक ,सतीश धोटे,भाजपा नेते ,संतोष देरकर ,तालुका अध्यक्ष ,प्रभाकर ढवस ,माजी सभापति, कृषी  उत्पन्न बाजार समिती ,नागेश्वर उरकुडे ,समन्वयक ,समीर रासेकर ,रतन काटोले ,हितेश जयपूरकर ,संदीप आदे,सहसचिव ,अमोल राऊत ,तालुका अध्यक्ष ,वंचित बहुजन आघाडी ,दिनेश पारखी ,तालुका अध्यक्ष ,मराठा सेवा संघ ,संदीप पारखी ,सुरेश बोबडे ,गजानन पहानपटे ,आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. 


शहरातील मुख्य बाजारपेठ मार्गाने रथ यात्रा फितर चूनाळा,सातरी ,वीहीरगाव ,मूर्ती ,नलफडि ,सिंधी ,वीरुर स्टेशन ,टेंबुरवाहि ,वरूर रोड ,सुमठाना ,रामपूर ,सास्त्ती या गावांमध्ये फिरली व कॉर्नर सभाच्या माध्यमातून ओबीसी समाजाची जनजागृती करून ओबीसी जातनिहाय जनगणना करण्यात यावी याबद्दल माहिती देण्यात आली.राजुरा येथे पत्रकार परिषद घेऊन या संपूर्ण रथ यात्रेचा उद्देश व समाजाकडून तसेच अन्य गावांतुन मिळणारा लोकसहभाग यावर सचिन राजूरकर ,बबनराव फंड यांनी सविस्तरपणे पत्रकारांशि संवाद साधला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन बादल बेले,तालुका महासचिव यांनी केले. 


तर आभार कपिल इद्दे ,तालुका कार्याध्यक्ष यानी केले.ही रथ यात्रा संपूर्ण चंद्रपुर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यांत फिरणार् असून या रथ यात्रेची सुरुवात 2 मार्च ला बल्लारपूर येथून करण्यात आली.तर समारोप चीमुर तालुक्यात 16 मार्च ला होणार आहे. राष्ट्रीय स्तरावरील होणाऱ्या जनगणनेत ओबीसी समाजाचा रखाणा नसल्याने या समाजाची संख्या मोजली जाणार् नाही त्यामुळे ओबीसी समाजाची सर्वच क्षेत्रातील मोठी हानि होणार आहे व आरक्षणावरही घाला घालण्याचा सरकारचा उद्देश आहे त्यामुळेओबीसी समाजाने या सुरू होणाऱ्या जनगणनेवर संपूर्ण बहिष्कार टाकावा असे आवाहन सचिन राजुरकर यांनी यावेळी केले.