आसिफ सय्यद यांची काँग्रेस ला सोडचिठी,राष्ट्रवादीत प्रवेश : राजुरा तालुका कार्यकर्ता बैठक संपन्न #NCP - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

आसिफ सय्यद यांची काँग्रेस ला सोडचिठी,राष्ट्रवादीत प्रवेश : राजुरा तालुका कार्यकर्ता बैठक संपन्न #NCP

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 



नवनियुक्त जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी पक्ष संघटन मजबुतीच्या दृष्टीने तालुकानिहाय दौऱ्याची सुरवात सुरू केली आहे.दरम्यान त्यांनी आज राजुऱ्याच्या स्वयंवर मंगल कार्यालयात तालुका,शहर,ग्रामीण राष्ट्रवादीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक पार पडली.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य होते.यावेळी ,युवक जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर,हिराचंद बोरकुटे,माजी जि.प.कृषी सभापती अरुण निमजे यांची उपस्थतीती होती.

राजूरा तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे संतोष देरकर व आशिष यमनुरवार यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाध्यक्ष रा.कॉ  राजेंद्र वैध, जि. रा. कॉं.युवक चे जिल्हाध्यक्ष नितिन भटारकर, रा.कॉ.महिला जिल्हाध्यक्ष बेबिताई उईके, जेष्ट नेते हिराचंदजी बोरकुटे, किसान सेल चे जिल्हाध्यक्ष सुरेशजी रामगुंडे, राजूरा विधानसभा अध्यक्ष अरुणजी निमजे व राजूरा विधानसभा रा.कॉं युवक अध्यक्ष कुणाल भाऊ गायकवाड यांचा उपस्थित आज स्वयंवर मंगल कार्यालय राजूरा येते राजूरा विधानसभा कॉंग्रेस चे शेकडो कार्यकर्ते व चंद्रपुर जिल्ह्या युवक कॉंग्रेसचे सचिव आसिफ सय्यद यांनी प्रवेश घेतला.


आसीफ सय्यद यांची राजूरा तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी च्या पदावर नियुक्ति करण्यात आली.तसेच चंद्रपुर जिल्हाध्यक्ष रा.कॉ राजेंद्र वैद्य व गडचांदुर नगर परिषद चे नवनियुक्त उपाध्यक्ष व नगरसेविकांचे सत्कार करण्यात आले.राजूरा शहर महिलाध्यक्ष पदावर सौ.पुष्पाताई कोडापे(माजी.नगरसेविका) यांची नियुक्ती करण्यात आली.

कार्यक्रमाचे संचालन आशिष यमनुरवार व आभार कुणाल भाऊ गायकवाड यानी मानले.


उपस्थित  अनंता ताजने, सचिन आसुटकर, प्रमोद कुंमरे, विजय कुंमरे, स्वप्निल बाजुज्वार,  आल्विन सावरकर, शरदभाऊ जोगी, सौ. कल्पना ताई निमजे, सौ. मीनाक्षी ताई एकरे, सौ. अश्विनीताई कांबळे,जयेश कारपेनवार.उपस्थित होते.

यावेळी येत्या २ महिन्यात गावनिहाय पक्षबांधणी आणि त्यानंतर पंचायत समिती निहाय बैठकांचे आयोजन करण्याचा मानस जिल्हाध्यक्षांनी प्रमुख कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केला.बैठकीदरम्यान नितीन भटारकर यांनी पक्षसंघटना बळकट करण्याचे आवाहन कार्यकर्त्याना केले.तालुक्यातील आगामी साऱ्याच निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे आव्हाहनही कार्यकर्त्याना केले.