आ. सुभाष धोटे यांना उत्तर दाखल करण्यास चार आठवडे !यात अॅड. वामनराव चटप यांनी दिले राजुरा विधानसभा निवडणुकीला आव्हान #nagpurhighcourt #subhash dhote #wamnrao chatap - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

आ. सुभाष धोटे यांना उत्तर दाखल करण्यास चार आठवडे !यात अॅड. वामनराव चटप यांनी दिले राजुरा विधानसभा निवडणुकीला आव्हान #nagpurhighcourt #subhash dhote #wamnrao chatap

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -


राजुरा येथील काँग्रेसचे आमदार सुभाष धोटे यांच्या निवडणुकीला स्वतंत्र भारत पक्षाचे पराभूत उमेदवार अॅड. वामनराव चटप यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात राजुरा विधानसभा 2019 च्या निवडणुकीला आव्हान देत काँग्रेस चे विजयी उमेदवार सुभाष धोटे यांच्या शपथपत्रात माहिती लपविल्याचा आरोप केला आहे. ही आव्हान याचिका मुंबई उच्च न्यायलायच्या नागपूर खंडपीठात दाखल झाल्यापासूनच राजुरा विधानसभेतील मतदारांत प्रकरणाविषयी उत्सुकता बघायला मिळत आहे.याप्रकरणी सुभाष धोटे यांनी न्यायालयाला केलेल्या विनंतीवरून उत्तर दाखल करायला चार आठवड्यांचा अवधी नागपूर खंडपीठाने दिला असून पुढील महिन्याभरात आमदार सुभाष धोटे काय उत्तर सादर करतील याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. याचिकेनुसार, उमेदवाराबद्दल माहिती मिळणे मतदारांचा अधिकार आहे. मात्र, आमदार घोटे यांनी ऑक्टोबर २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावर गुन्हे दाखल असल्याची माहिती लपवून ठेवली. आमदार धोटे यांच्याविरुद्ध अॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल असून, याबद्दल त्यांनी प्रतिज्ञापत्रात उल्लेख केला नाही; तसेच त्यांना अटकपूर्व जामीन सुद्धा मिळाला होता, ही बाब त्यांनी नमूद नकरता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमक्ष प्रतिज्ञापत्र दाखल केले, असा आरोप अॅड. चटप यांनी याचिकेत केला.

मागील सुनाणीदरम्यान उच्च न्यायालयाने स्वतंत्र भारत, निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोग, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी, आमदार घोटे यांच्यासह निवडणूक रिंगणातील अकरा उमेदवारांना नोटीस बजावली होती.
आज झालेल्या सुनावणीदरम्यान आमदार सुभाष धोटे यांनी लेखी उत्तर दाखल करण्याकरिता चार आठवड्यांचा अवधी मागितला आहे; तसेच या याचिकेतून निवडणूक आयोगाचे नाव वगळावे, अशी विनंती करणारा अर्ज अॅड.नीरजा चौबे यांनी दाखल केला. आमदार सुभाष धोटे यांच्यातर्फे अॅड. अक्षय नाईक यांनी, अॅड. चटप यांच्यातर्फे अॅड. रवी सन्याल, अॅड. संकेत पुराणिक यांनी बाजू मांडली.
क्लिक करा - हेही वाचा : ऐका ऑडिओ : हंसराज अहिर समर्थकांचा - " पंजाला मत मारा " भाजपचा प्रचार ? ◾️काँग्रेस आमदाराच्या विजयाचे फुटले बिंग...!!!#bjp #congress