कोरोनाच्या संचारबंदीत पव्व्याच्या दारूमुळे गावकऱ्यांनी अनुभवला जिवंत थरार प्राणघातक हल्ल्यात मुलाचा जागीच मृत्यू, वडील गंभीर #MURDER - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

कोरोनाच्या संचारबंदीत पव्व्याच्या दारूमुळे गावकऱ्यांनी अनुभवला जिवंत थरार प्राणघातक हल्ल्यात मुलाचा जागीच मृत्यू, वडील गंभीर #MURDER

Share This
खबरकट्टा / यवतमाळ : 


यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर  तालुक्यातील सुकळी येथे सोमवारी संध्याकाळी गावकऱ्यांनी पव्व्याच्या दारूमुळे जिवंत थरार अनुभवला. दारू पिऊन शिवीगाळ करणाऱ्या  शेजाऱ्याला हटकले असता, केलेल्या प्राणघातक हल्ल्यात युवकाला जागेवरच जीव गमवावा लागला,तर मृतकाचे वडील गंभीर जखमी असून,उपचारासाठी यवतमाळला हलविण्यात आले आहे, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

३० मार्चला संध्याकाळी साडे सात वाजता सुकळी येथे घडलेल्या घटनेत सूर्यकांत साहेबराव वासरवाड (२३) रा.सुकळी हा जागीच ठार झाला असून त्याचे वडील साहेबराव नामदेव वासरवाड (४८) रा.सुकळी हे गंभीर जखमी झाले आहे,त्यांचेवर आर्णी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून यवतमाळला हलविले आहे.


मृतकाची बहीण सौ.विद्या अर्जुन घंटलवार (२५) ह.राहणार सुकळी यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार आर्णी पोलिसांनी आरोपी गणेश रामभाऊ मोरे (२६) अविवाहित रा.सुकळी व शुभम रामभाऊ मोरे (१९) यांचे विरुध्द कलम ३०२,५०४,३४ भादंवी नुसार गुन्हा दाखल केला असून, काही प्रमाणपत्र प्राप्त झाले नंतर कलम वाढविणार आहे. 

दोन्ही आरोपींना पोलिसांनी रात्रीच बेड्या ठोकल्या व ताब्यात घेतले.तालुक्यातील आर्णी ते माहूर रोडवरील सुकळी गावात ३० मार्चला संध्याकाळी साडे सात वाजताचे दरम्यान घटनेतील आरोपी गणेश रामभाऊ मोरे हा दारू पिऊन नशेत असतांना त्याचे घराशेजारील भांडणातील गंभीर जखमी साहेबराव नामदेव वासरवाड व घटनेतील मृतक सूर्यकांत साहेबराव वासरवाड यांना जातीवर घाणेरड्या शब्दात शिवीगाळ करीत होता.