चंद्रपूर ब्रेकिंग : मानवी पायाचा तुकडा आढळल्याने शहरात खळबळ !#murder - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर ब्रेकिंग : मानवी पायाचा तुकडा आढळल्याने शहरात खळबळ !#murder

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

चंद्रपूर येथील शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयाच्या परिसरात अर्ध तुटलेला मानवी पाय सापडल्याने परिसरात खडबड उडाली आहे.

विधी महाविद्यालय प्रांगणातून निघणाऱ्या तुकूम रोडवरून जात असताना दुपारी 1:30 वाजताच्या आसपास एका शाळकरी मुलाला पायाचा तुकडा पडून दिसताच त्याने घाबरून बाजूच्या वसाहतीतील एका जेष्ठ नागरिकाला माहिती दिली असता त्यांनी तात्काळ रामनगर पोलीस ठाणे येथे कळविले. 

त्यानंतर लगेच डिबी पथकाने ठिकाण गाठत गंभीर घटना ध्यानात घेऊन डॉग स्कॉड ला पाचारण केले असून वृत्त लिहीत पर्यंत पोलीस उपविभागीय अधिकारी शिलवंत नांदेडकर, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, निरीक्षक प्रकाश हाके सुद्धा घटनास्थळी उपस्थिती होते असून नेमका काय प्रकार आहे अधिक तपास सुरु आहे.