चंद्रपूरच्या शेतकऱ्यांची हिंगणघाटात हत्त्या ! #murder hinganghat - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूरच्या शेतकऱ्यांची हिंगणघाटात हत्त्या ! #murder hinganghat

Share This
खबरकट्टा / वर्धा - हिंगणघाट 
मूळचा चंद्रपूर येथील रहिवासी असलेल्या शेतकऱ्यांची हत्या करून त्याचे प्रेत नजीकच्या सातेफळ शिवारात आज सकाळी 8 वाजता आढळून आले.

यशोदा सीड कंपनी समोरून गेलेल्या कॅनलच्या रोडवर आज सकाळी आठ वाजता शेतीच्या वादातून झालेल्या वादात अशोक शामराव पिसे वय ६० रा चंद्रपूर याची हत्त्या करण्यात आली. आरोपी प्रमोद मारुती मासुरकर वय 34 राहणार सातेफळ यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मृतक शेतकरी अशोक शामराव पिसे हा मागील वीस वर्षांपासून  चंद्रपूर येथील रहिवासी असून त्याची हिंगणघाट नजीक असलेल्या सातेफळ येथे अडीच एकर शेती आहे. यात चंद्रपूर येथे आटो चालवण्याचे काम करणारे अशोक पिसे हे आपल्या शेतीच्या कामानिमित्य आठवड्यातून तीन-चार वेळा हिंगणघाट येथे चंद्रपूरहुन रेल्वेने येतात. 

हिंगणघाट येथून ऑटो ने  सातेफळ नजिक असलेल्या यशोदा सीडस कंपनी जवळ उतरून आपल्या शेतात जातात. आज सकाळी आठ वाजता ते आपल्या शेतात जात असताना त्यांचा सामना आरोपी प्रमोद मारोती मासुरकर याच्याशी झाला.प्रमोद मासुरकर याची शेती ही मृतक अशोक पिसे यांच्या शेतीला लागून असून प्रमोद मासुरकर  याच्या शेतीतून अशोक पिसे याच्या शेतात जाण्याचा रस्ता आहे. या शेतीच्या रस्त्यावरून आरोपी प्रमोद व मृतक अशोक पिसे यांच्यात वाद सुरू आहे. आज सकाळी आपल्या शेतात जात असताना रस्त्यावरील बाभळी झाडे का कापली या वरून मृतक अशोक पिसे व प्रमोद मासुरकर यांच्यात वाद झाला. या वादात दोघात हाणामारी झाली असता आपल्या जवळ असलेली सब्बल आरोपी प्रमोद ने अशोक पिसे यांच्या दोन्ही पायावर मारून त्यांचेवर सब्लीने वार केले असता अशोक पिसे यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच हिंगणघाट पोलिस घटनास्थळी पोहोचले . यातील आरोपी प्रमोद मासुरकर यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.