विद्युत वितरण कंपनीचे जुनिअर इंजिनीअर पवनकुमार निवाते लाचलुचपत प्रतिबंधकानीं केली रंगेहात अटक ! #mseb - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

विद्युत वितरण कंपनीचे जुनिअर इंजिनीअर पवनकुमार निवाते लाचलुचपत प्रतिबंधकानीं केली रंगेहात अटक ! #mseb

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा 



राज्य विद्युत वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता पवनकुमार निवाते याला १ हजार ५०० रूपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली. ही कारवाई ५ मार्च ला सायंकाळी करण्यात आली.



तक्रारदार हे राजुरा रहिवासी असून यांचे सायकल पंच्चरचे दुकान आहे.सदर दुकानात नविन विद्युत पुरवठा कनेक्शन देण्याच्या कामाकरीता राज्य विद्युत वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता पवनकुमार निवाते यांनी स्वतः करीता त्यांचे कार्यालयातील खाजगी सुरक्षा गार्ड संजय खोब्रागडे यांचे मार्फत लाच म्हणून १५०० रुपये मागणी केली.



तक्रारदार यांची सहाय्यक अभियंता पवनकुमार निवाते व खाजगी सुरक्षा गार्ड संजय खोब्रागडे यांना लाच देण्याची त्यांची मुळीच ईच्छा नसल्याने त्यांचे विरुध्द लाचलुचपत प्रतिबिंधक कार्यालय चंद्रपूर येथे तक्रारदाराने तक्रार दिली. या तक्रारीवरून दि. ४ मार्च व दि.५ मार्च रोजी केलेल्या पडताळणीकार्यवाही मध्ये सहाय्यक अभियंता पवनकुमार निवाते व खाजगी सुरक्षा गार्ड संजय खोब्रागडे यांचे कडून लाचेची मागणी स्पष्ट झाल्याने राज्य विद्युत वितरण कंपनी राजुरा कार्यालयात पंचासमक्ष केलेल्या सापळा कार्यवाही दरम्यान आरोपी क्र.१ पवनकुमार हिरालाल निवाते, (३३), सहाय्यक अभियंता, म.रा.वि.वि. कंपनी राजुरा यांनी आरोपी क्र. २ संजय गोंविदा खोब्रागडे यांचे मार्फत १५००रु.लाच रक्कम स्विकारल्याने त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले असुन पुढील तपास कार्य सुरु आहे.





ही कार्यवाही नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस आयुक्त रश्मी नांदेडकर, अप्पर पोलीस अधीक्षक दुद्दलवार, यांचे मार्गदर्शनात चंद्रपूर येथील पोलीस उपअधीक्षक अविनाश भामरे, पोलीस निरीक्षक निलेश सुरडकर तसेच कार्यालयीन कर्मचारी अजय बागेसर, संतोष येलपूलवार यांनी यशस्वी कार्यवाही पार पाडली.