धक्कादायक चंद्रपूर ब्रेकिंग : नवजात मुलीला सोडून आईने काढला पळ ! The mother escapes leaving the newborn girl! - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

धक्कादायक चंद्रपूर ब्रेकिंग : नवजात मुलीला सोडून आईने काढला पळ ! The mother escapes leaving the newborn girl!

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :
नवजात मुलीला सोडून आई पळ काढल्याने एकच खळबळ उडाली आहे. शनिवारला दुपारच्या सुमाराला सात दिवसाच्या मुलीला घेऊन ती रू़ग्णालयात आली होती. सध्या मुलगी पोलिसांच्या ताब्यात असून रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू असून तिच्या आईचा शोध घेत आहे.
 शनिवारला दुपारी दोन महिला रुग्णालयात आल्या. एकीच्या हातात बाळ होते. त्या मेडिसिन वॉर्डात पोहचल्या. तिथे एक व्यक्ती उभी होती. औषधी घेण्याच्या बहाण्याने एक महिला निघून गेली. जवळपास अध्र्या तासाचा कालावधी उलटला. ती परतली नाही. याकाळात तिच्या सोबतच्या महिलेने त्या व्यक्तीशी ओळख केली. गेलेली सोबतीण आली नाही. 

ती बघून येतो असे सांगून जवळचे बाळ त्या व्यक्तीजवळ दिले आणि निघून गेली. बराच वेळ झाला त्यानंतर सुद्धा दोन्ही महिला परतल्या नाही. त्यामुळे शेवटी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिस पोहचले आणि मुलीला ताब्यात घेतले. सध्या मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. मुलीच्या आईचा शोध पोलिस घेत आहे. या रुग्णालयात सीसीटीव्ही नाही त्यामुळे असे प्रकार येथे वारंवार होतात.