कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मेडिकल दुकानदाराकडून ग्राहकांची लुट : कोरपना तालुक्यातील गडचांदुर, नांदा फाटा, कोरपना शहरात.मास्क, सँनीटाईझर, हँन्डवाँश या वस्तुची चढ्यादराने विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष , सामान्य.नागरिकांची कारवाई करण्याची मागणी #Massive sale of masks, sanitizers, handwashes #COVID-19 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मेडिकल दुकानदाराकडून ग्राहकांची लुट : कोरपना तालुक्यातील गडचांदुर, नांदा फाटा, कोरपना शहरात.मास्क, सँनीटाईझर, हँन्डवाँश या वस्तुची चढ्यादराने विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष , सामान्य.नागरिकांची कारवाई करण्याची मागणी #Massive sale of masks, sanitizers, handwashes #COVID-19

Share This
खबरकट्टा / हबीब शेख प्रतिनिधी कोरपना -


कोरपना तालुक्यातील गडचांदुर, नांदा फाटा,कोरपना या शहरात औषध विक्री करणाºया दुकानात (मेडिकल) सॅनिटायझर आऊट ऑफ़  स्टॉक झाले असून, मास्कची विक्री मनमानी दराने होत आहे. पर्याय नसल्याने नागरिकही दुकानदार सांगतील त्या दराने मास्क व सॅनिटायझरची खरेदी करत आहेत. कोरोना विषाणूची दहशत आता सर्वत्र दिसून येत आहे. या रोगाच्या भीतीमुळे मास्कची मागणी वाढली असताना त्याच धर्तीवर हॅण्ड सॅनिटायझरच्या मागणीतही वाढ झाली आहे. औषध विक्रेत्यांकडून मास्क व हॅण्ड सॅनिटायझरची धडाक्यात विक्री सुरु आहे. याचा फायदा विक्रेते घेत असल्याचे चित्र कोरपना तालुक्यात पाहायला मिळत आहे.

एरव्ही पाच रुपयाला मिळणारा साधा मास्क आता २० रुपयाला मिळत आहे. वॉशेबल मास्क ५० ते ७० रुपयांपर्यंत विकले जात आहेत. नागरिकांना मास्कची इतकी गरज वाटत असल्याने ग्राहक औषधाच्या दुकानात आले असता त्यांना स्टॉक नाही, एवढीच किंमत आहे, आम्हालाच परवडत नसताना आम्ही विकत आहोत. फक्त काही रुपयेच आम्हाला मिळत  आहेत. 

आमच्याच काय इतर कोणत्याही मेडिकलमध्ये जा, तुम्हाला यापेक्षा जास्त किमतीने मास्क विकत मिळतील, असे उत्तर विक्रेत्यांकडून येत आहेत. विक्री करण्यात  येणाºया मास्कवर एमआरपी नसल्याने ग्राहकांना खरी किंमत कळत नाही आहे.

बहुतांश औषध विक्रेते चढ्या दराने मास्कची विक्री करत आहे.  तालुक्यातील नागरिकांमध्ये कोरोनाचा धसका आहे. त्यांचे आरोग्य चांगले रहावे, यासाठी ते सॅनिटायझर, मास्क वापरत असताना काही औषध विक्री दुकानांमध्ये मास्क आणि सॅनिटायझर उपलब्ध नाहीत. तसेच चढ्या भावाने त्यांची विक्री होत आहे.  मास्क आणि सॅनिटायझरचा पुरेसा साठा आहे. 

ब्रॅण्डेड सॅनिटायझर झाले गायब -
कोरपना तालुक्यातील बहुतांश मेडिकल दुकानांमध्ये सॅनिटायझर उपलब्ध नसल्याचे पाहायला मिळाले. ज्या मेडिकलमध्ये सॅनिटायझर होते ते ब्रॅण्डेड नव्हते. मात्र त्याची किंमत ही ब्रॅण्डेड कंपनीच्या सॅनिटायझरएवढीच होती. या सॅनिटायझरची विक्री ही एमआरपीप्रमाणे होत असल्याचे दिसून आले.मास्क, हँन्डवाश, चढ्यादराने विकत असलेल्या औषध दुकानदारावर प्रशासनाने लक्ष देवुन कारवाई करण्याची मागणी सामान्य जनतेकडून होत आहे.