कोरोना इफेक्ट : महाराष्ट्र-तेलंगणा सीमा लॉकडाऊन : सीमेवरील वाहतूक ठप्प #Maharashtra-Telangana border lockdown #Corona Effect - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

कोरोना इफेक्ट : महाराष्ट्र-तेलंगणा सीमा लॉकडाऊन : सीमेवरील वाहतूक ठप्प #Maharashtra-Telangana border lockdown #Corona Effect

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -
आंतरराज्यीय सीमेवर असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात येणाऱ्या राजूरा तालूक्यातील लक्कडकोट तपासणी नाक्यावर वाहनं रोखण्यात आली आहेत. जनता कर्फ्यूमुळे जड वाहतूक पूर्णपणे थांबली आणि, रस्ते निर्मनुष्य झाले आहेत. तर, आदीलाबाद, असिफाबाद हे दोन्ही मार्ग बंद करण्यात आले असून नाका परिसरात वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या आहेत.कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जनता कर्फ्यूच्या आवाहनाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. जनता कर्फ्यू दरम्यान नागरिक कडेकोट बंदोबस्त पाळत आहेत. तर, महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील वाहतूक तेलंगणा सरकारने सील केली असून रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी आज देशभरात जनता कर्फ्यूचे आवाहन करण्यात आले होते. याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर, दुसरीकडे कोरोनाचे संशयित रुग्ण महाराष्ट्राच्या हद्दीतून तेलंगणात येऊ नये यासाठी महाराष्ट्र-तेलंगणा सीमा सील करण्याचा निर्णय  सरकारने घेतला आहे. त्यामुळे, गावागावात शुकशुकाट पसरलेला असतांना 24 तास वाहनांची वर्दळ असलेल्या महाराष्ट्र-तेलंगाणा सीमेवरील लक्कडकोट मार्ग शांत पडला आहे.


राजुरा तालुका मुख्यालयी ठिकाणून जाणाऱ्या मुख्य राज्य महामार्गावरही ठाणेदार श्री. नरेंद्र कोसूरकर यांनी वाहतूक व्यवस्थापनाच्या पूर्वदक्षते करिता सीमा बंदी - वाहतूक बंदीचे फलक लावले आहेत  या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे थांबली असून उभ्या वाहनांचा लांबच-लांब रांगा रस्त्यावर दिसत आहेत.