अखेर दोन नामांकित बिल्डर व मनसे पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल ! प्रतिमा ठाकूर यांना पोलिसांचे अभयदान का? #RAJ THACKERAY #MNS - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अखेर दोन नामांकित बिल्डर व मनसे पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल ! प्रतिमा ठाकूर यांना पोलिसांचे अभयदान का? #RAJ THACKERAY #MNS

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 

चंद्रपूर शहरातील अपेक्षा नगर, सोमय्या पॉलीटेकनिक जवळील नझूल च्या जागेवर असलेल्या वस्तीत मनसे पदाधिकारी प्रतिमा ठाकूर व भरत गुप्ता यांनी जबरदस्तीने जेसिबी मशीन नेऊन दलित महिलेच्या घराची तलवारी, चाकू चा धाक दाखवून पूर्ण तोडफोड केली असल्याची पीडितांच्या तक्रारीवरून रामनगर पोलीस ठाणे येथे अपराध क्रमांक 0311/2020 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

क्लिक करा -बघा : रामनगर पोलीस निरीक्षक प्रकाश हाके यांची प्रतिक्रियाभादंवि 143,147,149,448,427,506 नुसार काल 19मार्च 2020 ला रात्री 2:16 मिनिटांनी दाखल करण्यात आलेल्या या गुन्ह्यात बिल्डर दत्तू कंचर्लावार, गजानन नीलावार यांच्यासहित मनसेचे भरत गुप्ता इतर 4 ते 5 मुले व तीन बाया असा उल्लेख घेण्यात आला असून प्रतिमा ठाकूर यांचे नाव तीन वेळ सांगून सुद्धा तक्रारीत नाव नोंदविण्यात आले नाही असे सोनवणे नामक प्रतिदर्शी पिडीतेचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रतिमा ठाकूर यांची प्रतिमा का वाचवीली जात आहे याबाबदल शहरात उलटसुलट चर्चेला पेव फुटले आहे.


----------------------------------------------------

मनसे पदाधिकारी प्रतिमा ठाकूर व भरत गुप्ता यांची दलित महिलेच्या घरावर गुंडागर्दी?  तलवारी चाकू दाखवत जबरदस्तीने घर पडले -महिलेचे कथन, शहरातील बड्या बिल्डर सोबत हातमिळवणी करून नझूल च्या जागा बळकावण्यासाठी गुंडागर्दी #Maharashtra Navnirman Sena
खबरकट्टा / चंद्रपूर : 


चंद्रपूर शहरातील अपेक्षा नगर, सोमय्या पॉलीटेकनिक जवळील नझूल च्या जागेवर असलेल्या  वस्तीत मनसे पदाधिकारी प्रतिमा ठाकूर व भरत गुप्ता यांचीजबरदस्तीने जेसिबी मशीन नेऊन दलित महिलेचे घर तलवारी, चाकू चा धाक दाखवून पूर्ण तोडफोड केली असल्याची तक्रार पीडित महिला करीत असल्याचा विडिओ काल रात्री उशिरा सोशल माध्यमांवर फिरत होता. प्रकरणात अधिक माहिती घेतली असता मनसे पदाधिकारी प्रतिमा ठाकूर व भरत गुप्ता यांनी शहरातील कंचर्लावार, निलावर नामक बड्या बिल्डर कडून अपेक्षा नगर येथील नझूल जागेवर दलित वस्ती खाली करण्याकरिता या वस्तीत स्वतः महानगरपालिका कर्मचारी असल्याचे भासवत कोणताही नोटीस, आदेश न दाखवता जेसिबी लावून घरे पडायला सुरुवात केली. या वस्तीतील नागरिकांनी याचा विरोध दर्शविला असता तलवारी, चाकू चा धाक दाखवून मारहाण केल्याचे बयान कथन विडिओ तील पीडित करताना दिसत आहेत. बाबत काल रात्री रामनगर पोलीस ठाणे येथे या बेघर झालेल्या पीडित लोकांनी तक्रार देऊन गुन्हा नोंदविण्याची मागणी केली असल्याचे समजते. 

काल रात्री ही वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरल्याने अनेकांनी रामनगर ठाणे येथे गर्दी केली होती तरीही या प्रकरणात मनसे महिला शहर अध्यक्ष प्रतिमा ठाकूर व भरत गुप्ता यांना शहरातील काही बड्या बिल्डर व लोकप्रतिनिधींची साथ असल्याचे चर्चेत असून घर पाडून बेघर केलेल्या  कुटुंबाना  न्याय मिळेल काय प्रश्नचिन्ह आहे.टीप : हे वृत संपूर्णतः समाज माध्यमांवर वायरल होत असलेल्या विडिओ क्लिप च्या आधारवर प्रकाशित करण्यात आले या घटनेची अधिकारीक पुष्टी अधिकृत माहिती येत पर्यंत  संपादक करीत नाहीत.