जगायचे कसे ? मुल येथील २०० कामगारांवर उपासमारीचे संकट - : राजुरी स्टील अँड अलाॅय कंपनीने २ महिन्याचे वेतन थकविले #LOCKDOWN - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जगायचे कसे ? मुल येथील २०० कामगारांवर उपासमारीचे संकट - : राजुरी स्टील अँड अलाॅय कंपनीने २ महिन्याचे वेतन थकविले #LOCKDOWN

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : मूल प्रतिनिधी -

      
सध्या देशात कोरोना महामारीने लाॅकडाऊन आहे. घराच्या बाहेर पडायला देखील बंदी आहे. यात सर्वसामान्य कामगारांना मोठा फटका बसला आहे. यातच राजुरी स्टील अँड अलाॅय कंपनीत काम करणाऱ्या सुमारे २०० कामगारांचे मागील दोन महिन्याचे वेतन कंपनी प्रशासनाकडून अद्यापही देण्यात आलेले नाही. त्यामुळे कामगारांनी जगायचे कसे? हा प्रश्न निर्माण झाला आहे

           
मुल येथील राजुरी स्टील अँड अलाॅय प्रायव्हेट कंपनीमध्ये २०० कामगार कार्यरत आहेत. मात्र मागील दोन महिन्यापासून कंपनी प्रशासनाकडून कामगारांना काम करुनही वेतन देण्यात आलेले नाही. सध्या लॉकडाऊनमुळे कंपनी बंद अवस्थेत आहे. कंपनी प्रशासनाला वारंवार कामगारांकडून वेतनाबाबत विचारणा होवूनही कुठलेही उत्तर देण्यात येत नाही.
 


यामुळे २०० कामगारांच्या कुटुंबावर उपासमारीचे संकट ओढवले आहे. सदर कंपनीत मूल परिसरातील ग्रामीण भागातील अल्पभूधारक व दारिद्ररेषेखालील कामगार काम करतात. सदर कंपनी बरेचदा बंद अवस्थेत असते. कामगारांना पूर्ण दिवस काम मिळेलच याची हमी नसते. त्यातही मागील दोन महिन्याचे वेतन कामगारांना काम करूनही मिळालेले नाही. 

सध्या कामगारांच्या कुटुंबांची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. शिवाय पुढील दोन महिने कंपनीमध्ये कामगारांना लॉकडाऊनमुळे काम देखील मिळणार नाही असे कंपनी प्रशासनाकडून कळते. कामगारांकडून कंपनी प्रशासनाला वेतनाबाबत वारंवार विचारना करूनही त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहे. आधीच लाॅकडाऊनची परिस्थिती असतांना काम करून जगणाऱ्या कामगारांची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. 

लॉकडाऊनमुळे कामगारांना घराच्या बाहेर देखील पडता येत नाही. आंदोलनही करता येत नाही. त्याचाच फायदा कंपनी घेत असून अन्याय करीत असल्याचे कामगारांकडून बोलले जात आहे. या गंभीर बाबीकडे कंपनी प्रशासन व जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेऊन कामगारांच्या वेतनाचा प्रश्न सोडवावा अशी मागणी कामगार करीत आहेत.

लाॅकडाऊन होण्याअगोदर कंपणी व्यवस्थापनाकडून दोन दिवसांत थकित वेतन कामगारांना देण्याचे सांगण्यात आले. मात्र अद्यापही कामगारांना मागील दोन महिन्याचे वेतन देण्यात आले नाही. कोरोना महामारीतही कंपणीकडून कामगारांवर अन्याय होत असल्याने जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.-प्रफुल विरुटकर,कंपनी कामगार.