ऐतिहासिक दिवस : चंद्रपूरचे जनजीवन थांबले पहिल्यांदाच ! #lockdown in chandrapur #COVID-19 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ऐतिहासिक दिवस : चंद्रपूरचे जनजीवन थांबले पहिल्यांदाच ! #lockdown in chandrapur #COVID-19

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : रस्ते, चौक, बाजार निर्मनुष्य चंद्रपूर : कोरोना विरुद्ध लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना   जनता कर्फ्यू  पाळण्या केलेल्या आवाहनाला आज चंद्रपूर जिल्हावासीयांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. आज सकाळपासूनच चंद्रपुरातील रस्ते, चौक, बाजार निर्मनुष्य झाल्याचे चित्र बघायला मिळाले तर खाकी वर्दीतला माणूस तेवढा जेमतेम रस्त्यावर दिसत होते. 

लोकवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसटीची चाकेही आज जागचे जागीच थांबून असल्याचे चित्र चंद्रपूर बसस्थानकावर बघायला मिळाले. यासोबतच चंद्रपूर रेल्वेस्थानकही ओस पडले होते. 

चंद्रपूर शहरासह वरोरा, भद्रावती, चिमूर, नागभीड, ब्रह्मपुरी, सिंदेवाही, सावली, मूल, पोंभुरणा, गोंडपीपरी, बल्लारपूर, राजुरा, जिवती, कोरपना या तालुक्यामध्येही जनता कॉर्फु ला जनतेनी उत्तम प्रतिसाद देत नागरिकांनी घराबाहेर निघण्याचे टाळले. ग्रामीण भागात गुराखी देखील जनावरांना जंगलात चारायला नेले नाहीत त्यामुळे बैल, गायी, म्हशी शेतकरी बांधवांनी गोठ्यात बांधून ठेवल्या. सायं 6 वाजेपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात रस्ते सामसूम होते.