खबरकट्टा / चंद्रपूर : नागभीड प्रतिनिधी -
नागभीड वनपरिक्षेत्र अंतर्गत तेलीमेंढा येथे बिबट वाघ हा गावातील एका घरात घुसल्याची घटना 25 मार्च च्या रात्री 9 च्या सुमारास घडली. तेलीमेंढा गावाला लागून घणदाट जंगल आहे दरम्यान काल रात्री 9 च्या सुमारास बिबट वाघ हा भक्षच्या शोधात भ्रमित मार्गाने गावा जवळ आला तेव्हा गावातील लोकांना दिसला.
या बिबट ला जंगलात हाकलून लावण्याकरिता लोकांनी आरडाओरडा केली परंतु उलट बिबट हा लोकमत सोमाजी सतिबावणे यांच्या घरावर चढला व काहीवेळातच बिबटने घराच्या आत प्रवेश करून खाटेच्या आड ठाण मांडून बसला याची माहिती नागभीड वन विभागाला देण्यात आली. वन विभागाचे अधिकारी घटना स्थळ गाठून बिबटला पिंजर्यात कैद केले . बिबटच्या हालचाली वरून बिबट आजारी असल्याच अंदाज वर्तविल्या जात आहे.
बिबट ची वय समजू शकले नाही बिबट. आजारी असल्याचे बोलले जात असून या बिबट वर योग्य उपचार सुरू आहे कि नाही हे सुद्धा वनविभागाला माहित नाही. बिबच्या आजारा बाबतीत काहीच कुणाला माहिती नाही सदर प्रतिनिधीनी बिबट बाबतीत माहिती घेण्यासाठी आसएफओ महेश गायकवाड यांना दूरध्वनी सम्पर्क केला. पण त्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे पुढील कार्यवाही वर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.