अवैध दारू विक्रेत्यांकडून शेरज (बु. )येथील व्यक्तीला मारहाण ! तस्करांची वाढती मुजोरी -प्रशासनाचे दुर्लक्ष : चिंतेचा विषय ! #korpana - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अवैध दारू विक्रेत्यांकडून शेरज (बु. )येथील व्यक्तीला मारहाण ! तस्करांची वाढती मुजोरी -प्रशासनाचे दुर्लक्ष : चिंतेचा विषय ! #korpana

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : कोरपना 
कोरपना तालुक्यातील परधीगुडा या गावातील अवैध दारूविक्रेत्यांनी शेरज बु येथील दशरथ बोंडे या नावाच्या व्यक्तीला मारहाण करून त्यांची दुचाकी गाडी फोडली आहे.
       
शेरज (बु.) या गावाजवळ दशरथ बोंडे यांचे शेत असून ते नेहमी प्रमाणे शेतात काम करायला गेले होते,तेथे  पारधीगुडा येथील काही अवैध दारूविक्रेते त्यांच्या शेताजवळ अवैध दारूविक्री करत होते,दशरथ बोंडे यांनी त्यांना बोलले की,तुम्ही माझ्या शेताजवळ दारूविक्री करू नका परंतु त्या दारूविक्रेत्यांनी त्यांचे न ऐकता आम्ही दारू विक्री करू तुम्हाला काय करायचे ते करून घ्या, असे सांगितले व आपल्या सहकाऱ्यांना फोन करून दारू विक्रेत्यांनी चार चाकी गाडी मध्ये ५-६ सहकारी बोलवले व दशरथ बोंडे यांना मारहाण केली,व त्यांची दुचाकी गाडी सुद्धा फोडली.

ही अत्यंत गंभीर घटना असून होळी सारख्या सणाला गालबोट लावनारी घटना आहे. माहिती हाती येत पर्यंत कोणतीही पोलिस तक्रार दाखल झाली नव्हती तरीही कोरपना तालुक्यातील अवैध तस्करांची वाढती मुजोरी नागरिकांना चिंताग्रस्त ठरत आहे.