ज्योतिरादित्य सिंधियांनी सोडला काँग्रेसचा ‘हात’ #Jyotiraditya Scindia - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ज्योतिरादित्य सिंधियांनी सोडला काँग्रेसचा ‘हात’ #Jyotiraditya Scindia

Share This
खबरकट्टा / थोडक्यात :


ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आज काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. गेल्या काही महिन्यांपासून ते काँग्रेस पक्षात अस्वस्थ होते. आता ट्विटरवर त्यांनी राजीनामा पोस्ट केला आहे. 


काँग्रेससाठी हा प्रचंड मोठा धक्का मानला जातो आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी राजीनामा देणं काँग्रेसला चांगलंच मागे नेणारं आहे. मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य सिंधिया नाराज होते. कमलनाथ यांना मुख्यमंत्रीपद दिलं गेल्याने ही नाराजी उघडपणे समोर आली होती. आज मोदी-शाह यांच्या भेटीनंतर ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेसची साथ सोडली आहे. त्यामुळे राज्यसभेवर भाजपातर्फे उमेदवारी आणि त्यानंतर केंद्रात मंत्रिपद अशी ऑफर सिंधिया यांना मिळाली असावी अशी शक्यता काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी बोलून दाखवली. 

काँग्रेस पक्षात ते प्रचंड अस्वस्थ झाले होते. ज्योतिरादित्य सिंधिया हे तरुण नेतृत्व आहे. कायम डावललं गेल्याने सिंधिया हे नाराज झाले होते. आता ते पुढे काय करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ज्योतिरादित्य सिंधिया स्वतःचा पक्ष काढून भाजपाला पाठिंबा देतात की भाजपात थेट प्रवेश करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.