राजुरा संचारबंदी तही चालतोय जुगार अड्डा नागरीकांच्या आरोग्याशी खेळ प्रशासनाने दखल घेण्याची नागरीकाची मागणी #JUGAR - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

राजुरा संचारबंदी तही चालतोय जुगार अड्डा नागरीकांच्या आरोग्याशी खेळ प्रशासनाने दखल घेण्याची नागरीकाची मागणी #JUGAR

Share This
खबरकट्टा / राजुरा : कोरोना विषाणूंचा वाढता प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे एकापेक्षा जास्त नागरीक एकत्र येण्यास मज्जाव केला आहे विनाकारण रत्यावर घराबाहेर पडण्यास मनाई आहे असे असताना राजुरा येथील चुनाभट्टी वार्डात शेतशिवारा लगत काही रिकामटेकड्या कडुन जुगार भरविण्यात येत असल्याची माहिती समोर येत असल्याने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिकामटेकड्यावर कायदेशीर कारवाई व्हावी आणि सुरू असलेला जुगार अड्डा बंद करण्यात यावा अशी मागणी येथील नागरीकानी केली आहे.

राजुरा चुनाभट्टी वस्तीतल्या शेतशिवारी लगत असलेल्या रत्यावर खुलेआम सर्रासपणे  या रिकामटेकड्यांकडुन जुगार भरविण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे.प्रशासनाच्या नियमाचे सर्रास पणे उल्लंघन होत आहे  विनाकारण रत्यावर फिरणाऱ्या रिकामटेकड्या कारवाईचा बडगा उगरावा असे स्पष्ट आदेश पोलिस प्रशासनाला दिले आहे देशात संचारबंदी लागू आहे एकापेक्षा जास्त नागरीक जमावं होण्यास निर्बंध लादण्यात आले आहे. 

असे असताना नियमांचे उल्लंघन करून चुनाभट्टी वार्डात जुगार भरविण्यात येत आहे त्यामुळे जुगार पाहण्यासाठी नागरीकाची गर्दी लक्षनिय असल्याने हे एक प्रकारे साथरोग आजार कोरोणाला आमंत्रण देत आहेत त्यामुळे संसर्ग संक्रमण वाढण्याची शक्यताही नाकारता येणार नाही.

चुनाभट्टीत काही पांच सहा रिकामं टेकळे आपल्या निजी स्वार्था  व पैशाच्या लालसेपोटी जुगार भरवित आहे त्यामुळे हा जुगार पाहण्यासाठी नागरीकाची गर्दी मोठ्या संख्येने दिसतें कोरोना विषाणूंचा वाढता प्रसार रोखण्यासाठी सध्या देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे एकापेक्षा अधिक नागरीक जमावं होण्यास प्रशासनाने निर्बंध घातले आहे असे असताना काही रीकामटेकळ्या कडुन संचारबंदीचे उल्लंघन करीत आहेत.

हा  जुगार खेळ पाहण्यासाठी  असणा-या नागरीकांच्या गर्दीने बाकी परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची दाट शक्यता नाकारता येणार नाही शासनाच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या रिकामटेकड्या वर कायदेशीर कार्यवाही करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे

विशेष म्हणजे  चुनाभट्टी वार्डात पुणे मुंबई या मोठ्या शहरातुन काही नागरीकानी आगमन केले आहेत हि माहिती मिळाली असता सतर्कतेने प्रशासनाने त्याचें घर गाठले व  तपासणी केली व याना या साथरोग आजार कोरोना विषयी माहिती दिली देशात संचारबंदी लागू आहे यांचे पालन करावे कुणी घराच्या बाहेर पडु नयेत असे सांगितले असताना बाहेरून आलेले व्यती व परिसरातील काही रिकामटेकडे हे  कोणतिही दक्षता न घेता जणू काही बागेत सैरसपाटा मारतोय असे समजून दिवसभर वार्डात फेरफटका मारताना दिसतात व काही रिकामटेकडे जुगार चालविताना दिसतात असे चित्र परिसरात सध्या पाहायला मिळते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वृत्त वाहिनीच्या माध्यमातून रात्री देशवासीयांशी संवाद साधला. देशात २१ दिवसांसाठी लॉकडाऊन होत असल्याची घोषणा त्यांनी केली. काल रात्री १२ पासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली. या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. या प्रकरणी गृह मंत्रालयानं काही मार्गदर्शक सूचना घालून दिल्या आहेत. 

त्यातल्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. काही नियमांचं पालन न केल्यास थेट तुरुंगवासाची शिक्षादेखील होऊ शकते.असे प्रावाधान असताना बिनदिक्कत फिरणाऱ्या व जुगार चालविणाया रिकामटेकड्यावर प्रशासनाकडून काय कारवाई केली जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.