दुर्गम भागातील विद्यार्थीनी ची जागतिक महिला दीना निमित्त भेट. - जीवती तालुक्यांतील करणकोंडी गावातील विध्यार्थीनी व परिवारा सोबत साधला संवाद #jivti - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

दुर्गम भागातील विद्यार्थीनी ची जागतिक महिला दीना निमित्त भेट. - जीवती तालुक्यांतील करणकोंडी गावातील विध्यार्थीनी व परिवारा सोबत साधला संवाद #jivti

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा 8 मार्च 


संपूर्ण देशभरात " जागतिक महिला दीनाचे " औचित्य साधून अनेक कार्यक्रम व विविध क्षेत्रात विशेष काम करणाऱ्या महिलांचा सत्कार या दिवशी केला जातो.विविध क्षेत्रात उंच भरारी महिलांनी घेतली असून जवळपास सर्वच क्षेत्रात तिने आपले अस्तित्व ध्य केले आहे. 

राजुरा येथील आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर ची इयत्ता सहावी ची विध्यार्थीनी कु. पायल जयसिंग राठोड व  आदर्श हायस्कूल ची माजी विध्यार्थी उषा राठोड हिची व तिच्या परिवाराची  भेट घेऊन जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.

जीवती तालुक्यापासून पाच ते सहा  किलोमीटर अंतरावर असलेल्या  करणकोंडी या फक्त एकशे दहा घरे असलेल्या अतिशय दुर्गम भागात ही विध्यार्थीनी राहाते. जिथे पिण्याच्या पाण्याकरिता संघर्ष करावा लागतो. आपल्या प्राथमिक गरजा पूर्ण करीता दिवस रात्र परिश्रम करावे लागतात. तरीही परिस्थितीची काळजी न करता शिक्षणाकरीता राजुरा येथील आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर शाळेत ही शिक्षण घेते. कीरायाच्या रूम मधे आपल्या बहीण व भावांसोबत राजुरा येथे  राहाते. अतिशय दुर्गम भागात राहाणाऱ्या या विद्यार्थीनीला आज जागतिक महिला दीनानीमीत्य ग्रूहभेट देऊन तिचे व तिच्या परिवाराचे मनोबल वाढौन महिला दीनाचे महत्व सांगण्यात आले.

यावेळी आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर चे पर्यवेक्षक तथा इयत्ता सहावीचे वर्गशिक्षक बादल बेले, आदर्श हायस्कूल चे मुख्याध्यापक सारीपुत्र जांभूळकर सह पायल व  उषा च्या परिवारातील नातेवाहीक मंडळी आई वडील उपस्थित होते.
दुर्गम भागात राहून आपल्या आर्थिक परिस्थितीला न घाबरता शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थीनी ला खऱ्या अर्थाने जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा प्रत्यक्ष भेटून देतांना शिक्षकांनी आनंद व्यक्त केला.नुसते एकमेकांना मेसेज करून शुभेच्छा देण्यापेक्षा समाजातील अशा महिलांचा सन्मान केला पाहिजे तरच खऱ्या अर्थाने जागतीक महिला दीनाचे पावित्र्य आणि महत्व टिकेल व रूजेल.