जेसिबी खाली दबून चालकाचा मृत्यू : चुकून दाबला रिव्हर्स गेअर आणि गेला जीव :चालकविरहीत जेसीबी मागे जात थांबली एक किमी अंतरावर ! #jcb - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जेसिबी खाली दबून चालकाचा मृत्यू : चुकून दाबला रिव्हर्स गेअर आणि गेला जीव :चालकविरहीत जेसीबी मागे जात थांबली एक किमी अंतरावर ! #jcb

Share This
चालकाकडून चुकून रिव्हर्स गेअर दाबला गेल्याने जेसीबीला झटका लागून चालक अचानक जमीनीवर पडला आणि जेसीबीचे चाक त्याच्या डोक्यावरून गेले. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला आणि चालकविरहीत असलेली जेसीबी ही मागे जात जवळपास एक किमी अंतरावर जाऊन थांबले.

खबरकट्टा / चंद्रपूर - गोंडपिपरी -विहिरीचे खड्डे बुजवून परत येणाऱ्या जेसीबीचा चालकाने चुकीने दाबलेल्या रिव्हर्स गिअरमुळे झटका लागून तो जमिनीवर पडला आणि जेसीबी त्याचे डोके चिरडत जवळपास एक किमी अंतरावर जाऊन थांबला. हा विचित्र अपघात धाबा गावापासून ४ किमी अंतरावर असलेल्या चेक सोमणपल्ली शेतशिवारात शुक्रवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास घडला. तिरूपती बोबाटे (रा. टोकनी पारगाव, तेलंगाणा) असे मृत चालकाचे नाव आहे.
गोंडपिपरी तालूक्यात विविध योजनेमार्फत विहीरी मंजूर झाल्या. विहिरीचे बांधकाम झाले असून विहीरीसाठी खोदताना निघालेली माती जेसीबीच्या सहाय्याने बुजविणे सुरू आहे. पोडसा येथील प्रविन घ्यार यांच्याकेड आज दिवसभर जेसीबीने माती बुजविण्याचे काम सुरू होते. संध्याकाळी सहाच्या दरम्यान काम आटोपल्यावर जेसीबी घेऊन चालक तिरुपती बोबाटे हा घराकडे निघाला.


दरम्यान, चालकाकडून चुकून रिव्हर्स गेअर दाबल्या गेला आणि यामुळे जेसीबीला झटका लागल्याने तो अचानक जमीनीवर कोसळला आणि जेसीबीचे चाक त्याच्या डोक्यावरून गेले. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला आणि चालकविरहीत असलेली जेसीबी ही मागे जात जवळपास एक किमी अंतरावर जाऊन थांबले. घटनेची माहिती धाबा पोलीसांना देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.