जनता कर्फ्यु : टाळ्या वाजवून नागरिकांनी केली प्रशासना प्रति कृतज्ञता व्यक्त ! पुढील काही दिवस याच निष्ठेने जबाबदारी पार पाडण्याची गरज -अँड. संजय यादवराव धोटे, राजुरा #Jantacurfew #COVID-19 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जनता कर्फ्यु : टाळ्या वाजवून नागरिकांनी केली प्रशासना प्रति कृतज्ञता व्यक्त ! पुढील काही दिवस याच निष्ठेने जबाबदारी पार पाडण्याची गरज -अँड. संजय यादवराव धोटे, राजुरा #Jantacurfew #COVID-19

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 22 मार्च रोजी सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत 'जनता कर्फ्युचे' आवाहन केले होते. त्यास चंद्रपूर शहरासहित जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात आज दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आला. 

सर्वच तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत सर्वांनी घरीच राहून शंभर टक्के सहभाग नोंदवला. सकाळपासून येथील सर्वच बाजार पेठा,  बस स्थानक व  रस्ते अगदी ओस पडले होते तर अधून एका दुका वाहने पाहण्यात येत होती. संध्याकाळी पाच वाजता कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी रात्रंदिवस परिश्रम घेत आपल्या सेवेत तत्पर असलेल्या डॉक्टर ,नर्स ,पोलीस कर्मचारी ,बस चालक , मीडिया बांधव तथा अत्याआवश्यक सेवा देणाऱ्या सर्व बांधवांचे  शंख, घंटानाद, थाळी नाद व टाळ्या वाजवून कृतज्ञाता व्यक्त करत वाजवून अभिवादन करण्यात आले.दिवसभर घरात बसून असलेल्या प्रत्येकाला या उपक्रमामुळे नवा उत्साह मिळाला असून जनतेमध्ये कोरोना संकरणाबाविषयी भीती ऐवजी दक्षतेची खबरदारी घेण्याची साकारात्म जाणीव यातून निर्माण झाल्याच्या आनंदी प्रतिक्रिया नागरिक आपले टाळ्या - थाळ्या वाजवताना, घंटा-शंखनाद करतानाचे फोटो विडिओ सोशल माध्यमांवर प्रसारित करीत असल्याचे सर्वत्र चित्र आहे. 


    https://youtu.be/11a0l0-A8cs
जनता कर्फ्यू हि स्वतःवरची बंदी नव्हे तर कोरोना वर मात करायची संधी आहे.कोरोनाला रोखण्यासाठी पुढील काही दिवस याच निष्ठेने जबाबदारी पार पाडण्याची गरज असून  'जनता कर्फ्यु' उद्या सकाळी 5 वाजता पर्यंत पाळण्याच्या पुढील सूचनेचे आपण सर्वांनी स्वागत करून देशाला कोरोना निर्जंतुकीकरणाकडे नेण्यास हातभार लावूया - अँड. संजय यादवराव धोटे, राजुरा, चंद्रपूर.