जलयुक्तमुळे नारंडा झाले जलमय : पाण्याच्या भूजल पातळीमध्ये वाढ : शेतकऱ्यांना व गावातील नागरिकांना दिलासा #jalyuktshivar - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जलयुक्तमुळे नारंडा झाले जलमय : पाण्याच्या भूजल पातळीमध्ये वाढ : शेतकऱ्यांना व गावातील नागरिकांना दिलासा #jalyuktshivar

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : कोरपना -
   
कोरपना तालुक्यातील नारंडा हे गाव शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेमुळे जलमय झालेले आहे.तसेच पाण्याच्या भूजल पातळीमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे.याकरिता तत्कालीन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व तत्कालीन आमदार अँड.संजय धोटे यांच्या माध्यमातून भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने यांनी पाठपुरावा करून विविध प्रकारचे कामे मंजूर केले होते.
    
जलयुक्त शिवार अभियान योजना ही देवेंद्र फडणवीस सरकारची एक महत्त्वाकांशी योजना होती,या योजनेअंतर्गत राज्यातील अनेक गावांमध्ये जलसंधारणाचे अनेक कामे करण्यात आलेले आहे.
      
नारंडा गावात सुद्धा जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आलेले होते याअंतर्गत ९ किमी नाला खोलीकरण करण्यात आला आहे.यामुळे पुराचे पाणी शेतकऱ्यांच्या थेट शेतात न जाता सरळ मार्गाने जाते.तसेच शेतकऱ्यांच्या पिकांची होणारी नुकसान सुद्धा या नाला खोलीकरणामुळे टळत आहे.
तसेच गावामध्ये ७ सिमेंट बंधारे सुद्धा बांधण्यात आलेले आहे. यामुळे नाल्याचे पाणी थेट नदीमध्ये न जाता बंधाऱ्यामुळे पाणी अडत आहे त्यामुळे पाण्याच्या भूजल पातळीमध्ये वाढ होत आहे.
      
तसेच शेतकऱ्यांच्या शेतात कृषी विभागातर्फे ढाळीचे बांध टाकण्यात आले आहे.त्यामुळे शेतातील सुपीक माती ही शेतातच टिकून राहण्यास मदत होत आहे.
      
तसेच नारंडा येथील मोठ्या तलावाचे सुद्धा खोलीकरण करण्यात आले आहे.त्यामुळे सुद्धा पाण्याच्या साठवणुकीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली बघायला मिळत आहे.तसेच वनविभागातर्फे सुद्धा वनतलावाची निर्मिती नारंडा येथे करण्यात आलेली आहे.तसेच वनविभागातर्फे वनजमिनीवर सलग समतल चर बनविण्यात आले आहे.
      
नाल्यात पाणी खोलवर जावे याकरीता १० रिचार्ज शाफ्ट सुद्धा मारण्यात आलेले आहे.यामध्ये पुराचे पाणी थेट खोलवर जमीवर जाण्यास मदत होते.
      
अश्या प्रकारे जवळ्पास ४.२५ कोटी रुपये निधीचे कामे नारंडा गावात करण्यात आले आहे.या सर्व कामांमुळे नारंडा गावातील गावातील पाण्याच्या भूजल पातळीमध्ये वाढ झालेली आहे.
      
जलयुक्त शिवार योजनेच्या पूर्वी नारंडा गावात दरवर्षी मार्च-एप्रिल महिना येताच दुष्काळ पडत होता,त्यामुळे गावात पाणी टंचाई निर्माण होत होती तसेच गावातील महिलांनासुद्धा पाण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत होता,परंतु जलयुक्त शिवार अभियान योजनेमुळे पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झालेली आहे.त्यामुळे मार्च महिना सुरू असून सुद्धा तलाव व नाला यामध्ये पाण्याची साठवनुक मोठ्या प्रमाणात आहे.त्यामुळे पाणी टंचाई भासणार नाही याची आता १००% खात्री झालेली आहे.
    
यासर्व बाबींमुळे नारंडा गावातील शेतकरी,नागरिक व महिला वर्गात आनंदाचे वातावरण आहे.