अवैध वनोपज वाहतुक प्रकरणी ट्रक जप्त : बल्लारपूर वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची कार्यवाही #Illegal forest produce - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अवैध वनोपज वाहतुक प्रकरणी ट्रक जप्त : बल्लारपूर वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची कार्यवाही #Illegal forest produce

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :बल्लारशाह :-


काल दिनांक 18.03.2020 रोजी ट्रक क्र. MH-34 A-2686 मध्ये बामणी कोठारी महामार्गावर अवैधरित्या विनापरवाना वनोपज वाहतुक करित असल्याबाबत मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे श्री. एन.आर. भोवरे, क्षेत्र सहाय्यक, बल्लारशाह, वनरक्षक श्री. सुरवसे व श्री. कांबळे यांनी नमुद ट्रक ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता अवैध वनोपज वाहतुक प्रकरणी ट्रक जप्त  करण्यात आला आहे. 

बल्लारपूर वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या या कार्यवाहीत सदर ट्रकमध्ये इतर किसम प्रजातीचे 21 नग विनापरवाना वाहतुककरीत असल्याचे निदर्शनास आले. त्यावरुन ट्रक व वनोपज जप्त करुन आरोपी सुभाष गोविंदा देशमुख रा,बल्लारशाह व रियाज ईकबाल शेख रा. कोठारी यांचे विरुदध भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 41 (1)ब अन्वये, महाराष्ट्र वन नियमावली 2014 चे कलम 41 अन्वये नुसार वनगुन्हा क्रमांक 15223 दिनांक 19.03.2020 नोंद करण्यात आला आहे. 

सदर वन गुन्हयाचा तपास श्री. एस.आर.थिपे, वनपरिक्षेत्र अधिकारी बल्लारशाह यांचे मार्गदर्शनात श्री. एन.आर. भोवरे, क्षेत्र सहाय्यक, बल्लारशाह करीत आहे.