दहावीचा पेपर देऊन घरी जाणा-या विद्यार्थीनीचा विनयभंग; विरूर स्टेशन येथील आरोपीला अटक #harassment - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

दहावीचा पेपर देऊन घरी जाणा-या विद्यार्थीनीचा विनयभंग; विरूर स्टेशन येथील आरोपीला अटक #harassment

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : विरूर स्टेशन -राजुरा तालुक्यातील विरुर स्टेशन येथे इयत्ता दहावी परिक्षेचा पेपर देऊन आपल्या गावी सायकलने जाणा-या एका अल्पवयीन विद्यार्थीनीची छेड काढल्याच्या तक्रारी वरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. 


दिनांक १६ मार्चला इयत्ता दहावी परिक्षेचा पेपर संपवून एक सोळा वर्षीय अल्पवयीन विद्यार्थीनी दुपारी विरुर स्टेशन येथून आपल्या सहा किलोमीटर अंतरावरील गावी सायकलने जात होती.

यावेळी विरुर स्टेशन च्या इंदीरानगर वार्डातील अजय भारत मेश्राम हा युवक मागुन आला आणि त्याने या विद्यार्थीनीचा हात पकडून छेड काढली. यानंतर या मुलीने प्रसंगावधान राखून आपली सुटका करवून गावात गेली. तिने आपल्या आईला घडलेल्या घटनेची माहिती दिली. यानंतर ती आपल्या आईला घेऊन विरुर पोलिस ठाण्यात आली आणि तक्रार दाखल केली.

विद्यार्थीनीच्या तक्रारीवरुन विरुर पोलिसांनी आरोपी अजय मेश्राम, वय २१ याचे विरुध्द भादंवि कलम ३५४, ३५४ ए व डी आणि पोक्सो कायदा यानुसार गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली. या प्रकरणाचा तपास ठाणेदार कृष्णकुमार तिवारी, उपनिरीक्षक वडतकर, महिला पोलिस छाया देवरे व अन्य सहकारी करीत आहेत.