धक्कादायक चंद्रपूर ब्रेकिंग : अल्पवयीन मुलीला गरोदर करून नऊ महिने पीडित कुटुंबाला ठेवले धाकात : खाजगी डॉक्टरांकडे डिलिव्हरी ला नेल्यावरही डॉक्टरांची सतर्कता नाही : पैशाअभावी खाजगी डॉक्टर ने परत पाठविले : अखेर शेजाऱ्यांच्या सतर्कतेने आरोपीवर गुन्हा दाखल व तात्काळ अटक #harassment #POCSO - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

धक्कादायक चंद्रपूर ब्रेकिंग : अल्पवयीन मुलीला गरोदर करून नऊ महिने पीडित कुटुंबाला ठेवले धाकात : खाजगी डॉक्टरांकडे डिलिव्हरी ला नेल्यावरही डॉक्टरांची सतर्कता नाही : पैशाअभावी खाजगी डॉक्टर ने परत पाठविले : अखेर शेजाऱ्यांच्या सतर्कतेने आरोपीवर गुन्हा दाखल व तात्काळ अटक #harassment #POCSO

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : बल्लारपूरएका अल्पवयीन मुलीला गर्भवती करून संपूर्ण 9 महिने तिला व आई वडिलांना धाकात ठेऊन गुन्हा लपविण्याचा धक्कादायक प्रकार बल्लारपूर शहरात 25 मार्च ला उघडकीस आला असून समाज माध्यमांनी विषय प्रकाशझोतात आणल्यावर कोरोना संकट आवरण्यात व्यस्त असलेल्या प्रशासनाने काल 26 मार्च ला पीडितेच्या शेजारी महिलेने सादर केलेल्या तक्रारीवरून तात्काळ तपासचक्र फिरवीत गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली. 
शहरातील टेकडी विभाग महाराणा प्रताप वॉर्ड येथील रहिवासी एका अल्पवयीन (13 वर्ष )मुलीला शेजारच्या आरोपी शिवा रमेश भेंनवाल( 21 वर्ष )याने गर्भवती केले असल्याची माहिती शेजारच्या लोकांना मिळाली माहीती मिळताच आजूबाजूच्या परिसरातील सतर्क नागरिकांनी पीडितेच्या घरासमोर दिनांक 25 मार्च गर्दी केली. नारगरिकांची गर्दी बघून आरोपीने पीडित मुलगी व तिचा आई आणि वडील यांना धमकावून चंद्रपूर येथे खाजगी दवाखाना येथे नेले परंतु तेथे गर्भपात झाले नसल्याने पीडित मुलगी व आई -वडीलला घेऊन गायब झाल्याची माहिती पीडितेच्या शेजार्यांना कळताच काल पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

बल्लारपूर पोलीस निरीक्षक भगत यांनी लगेच पोलीस यंत्रणा फिरवली व मोठ्या शिताफीतीने चंद्रपूर येथील रायत्तवारी येथून एका घरात लपुन ठेवलेल्या पीडित व आई वडील यांना पोलिसांनी आपल्या ताब्यात घेऊन व सोबत आरोपींना घेऊन बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे दि,26 ला सकाळी साडे अकरा वाजता आणण्यात आले. 

काल  दिवसभर पीडित मुलगी ची शहानिशा करून शेजारच्या महिला फिर्यादी दीपिका मनोज डुगलच व मीनाक्षी भारत चुनियाने यांच्या प्राथमिक तक्रारीच्या आधारे आरोपी शिवा रमेश भेनवाल(21)आणि त्याचा मोठा भाऊ राजेश रमेश भेंनवाल(35)व त्यांच्या बहिणीवर कलम 376 (3)पास्को कलम4,5,(i)(q),6,16,17,अन्व्येगुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आले आहेत, पुढील तपास ठाणेदार भगत यांच्या मार्गदर्शनत सहायक पोलिस निरीक्षक राजूरकर करीत आहे.