बाळा धोटे यांची आत्महत्या !#farmersuicide - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

बाळा धोटे यांची आत्महत्या !#farmersuicide

Share This
कढोली येथे शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या : बाळा नानाजी धोटे यांनी जिल्हा मध्यवर्ती  बँकेचे कर्ज घेतले होते.

खबरकट्टा / कोरपना प्रतिनिधी -


सततची नापिकी, डोक्यावर झालेले कर्जाचे ओझे कसे फेडावे या विंवचनेत असलेल्या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कोरपना तालुक्यातील कढोली येथे आज सायंकाळी 6: 30 वाजता त्यांच्या गुरांच्या कोठ्यात उघडकीस आली. 

बाळा नानाजी धोटे (वय 60) असे त्यांचे नाव आहे. 10एकर कोरडवाहू शेतीचे मालक असलेल्या बाळा धोटे यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैक शाखा नांदा फाटा बँकेचे  2 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. 

घेतलेले कर्ज कसे फेडावे या काळजीने त्रस्त होते.याच विवंचनेत त्यांनी गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केली असे कुटुंबियांचे म्हणणे असून या प्रकरणी गडचांदुर पोलिस तपास करीत आहे.