प्रेस लिहिलेल्या कार मधून दारू तस्करी : नांदाफाटा येथील अट्टल तस्करांना स्थानिक गुन्हे शाखेने केली बल्लारपूर येथे अटक : २८ लक्ष ३० हजार ५५० रूपयाचा मुद्देमाल जप्त : गौरव बंडीवार, नविन पिरया मल्लारपू,मोईनिद्दीन फैजुद्दीन सिध्दीकी, सुरेश धनपाल मलेकोरवन या नांदाफाटा येथील तस्करांना अटक #darubandi - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

प्रेस लिहिलेल्या कार मधून दारू तस्करी : नांदाफाटा येथील अट्टल तस्करांना स्थानिक गुन्हे शाखेने केली बल्लारपूर येथे अटक : २८ लक्ष ३० हजार ५५० रूपयाचा मुद्देमाल जप्त : गौरव बंडीवार, नविन पिरया मल्लारपू,मोईनिद्दीन फैजुद्दीन सिध्दीकी, सुरेश धनपाल मलेकोरवन या नांदाफाटा येथील तस्करांना अटक #darubandi

Share This
स्थानीक गुन्हे शाखेची अवैध दारू तस्करी विरुद्ध कार्यवाही २८ लक्ष ३० हजार ५५० रूपयाचा मुद्देमाल जप्त.
खबरकट्टा / चंद्रपूर : दिनांक १३/०३/२०२० रोजी रात्रौ दरम्यान स्थानीक गन्हे शाखा चंद्रपूर येथील पथकास गोपणीय माहीती मिळाली की येनबोडी ते मानोरा येणारे रस्त्याने ट्रक क्रं.एमएच ३४ बिजी ४९३६ व एका विटारा लाल रंगाच्या ब्रिझा कारमध्ये एमएच ३४ बीएफ ९८४१ अवैधरीत्या दारुची वाहतुक होत आहे, अशी माहीती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व कर्मचारी हे पोस्टे बल्लारशा हद्दीमध्ये येनबोडी ते मानोरा मौजा भडकाम गावाजवळ रोडवर दवा धरुन बसले. काहीवेळातच पथकांस मिळालेल्या माहीतीप्रमाणे विटारा ब्रिझा कार व एक मिनी ट्रक पोलीसांना येताना दिसताच त्यास थांबवून अवैध दारूबाबत झडती घेतली असता नमुद ट्रकमध्ये असलेला खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

१) ५९ खरड्याचे खोक्यात एकुण ५,९०० नग ९० मिली नी भरलेल्या रॉकेट देशी दारूच्या शिश्या किं. ५.९०,०००/-रु.

२) ०१ खरड्याचे खोक्यात एकुण ४८ नग १८०मिली नी भरलेल्या रॉकेट देशी दारूच्या शिश्या किं. ९,६००/-रु.

३) दारू वाहतुकी करीता वापरलेला अशोक लेलॅन्ड कपनीचा १२१४ मॉडेल विटकरी रंगाचा मिनी ट्रक क्रं. एमएच ३४ बिजी ४९३६ त्याची किमंत १५,००,०००/-रु. 

४) दारु वाहतुकी करीता वापरलेली कथीया रंगाची मारुती विटारा बिझा कार क्रं. एमएच ३४ बिएफ ९८४१ त्याची किमंत ७,००,०००/-रु

५) चार आरोपीकडुन एकुन पाच मोबाईल त्याची ९५०/-रु. असा एकुण २८,३०,५५०/-रु. चा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. 
या कार्रवाहीत मुख्य आरोपी नामे गौरव लक्ष्मण बंडीवार वय २४ वर्ष रा. सम्राटनगर नांदा फाटा,  नविन पिरया मल्लारपू वय २९ वर्ष रा. नांदाफाटा,  मोईनिद्दीन फैजुद्दीन सिध्दीकी वय ३० वर्ष रा. नांदाफाटा, सुरेश धनपाल मलेकोरवन वय ३४ वर्ष नांदाफाटा याचे विरूध्द पो.स्टे. बल्लारशा अप क. २६४/२०२० कलम ६५(अ), ८३ म.दा.का. अन्वये गुन्हा नोंद करून आरोपीस अटक करण्यात आली असुन पुढील तपास बल्लारशाह पोलीस करीत आहे.


सदरची कार्यवाही डॉ. श्री. महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक स्थानीक गुन्हे शाखा चंद्रपुर श्री. कोकाटे यांचे नेतृत्वात पोउपनि विकास मुढे, नापोशि महेंद्र भुजाडे/१०२४,नापोशि अविनाश सोमवार/१९६३, पोशि संजय वाढई/२४३५, जावेद सिद्दीकी/ २५३२ कुंदन बावरी/२९४९ या पोलीस पथकाने पार पाडली.