चंद्रपूर ब्रेकिंग : दारू वाहतूक करणारे वाहन पलटले - चालक जागीच ठार -जनता कर्फ्यूतही गावकऱ्यांनी गर्दी करत लुटला विदेशी दारू साठा #Darubandi #COVID-19 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर ब्रेकिंग : दारू वाहतूक करणारे वाहन पलटले - चालक जागीच ठार -जनता कर्फ्यूतही गावकऱ्यांनी गर्दी करत लुटला विदेशी दारू साठा #Darubandi #COVID-19

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर : भद्रावती एकीकडे कोरोना च्या भितीने देशातील प्रत्त्येक नागरिक आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरता स्वतःहून संचारबंदी लादून घेतली आणि स्वतःच्या घरी राहून जनता कर्फ्यू उत्स्फूर्त पणे पाळत असताना मात्र दारू तस्करानी याच संधीचा फायदा घेवून निर्मनुष्य रस्त्यांने आपल्या दारूची अवैधरित्या वाहतूक करीत आहेत.


अशीच एक मोठी घटना आज भद्रावती रोडवर उघडकीस आली असून स्विफ्ट डिझायर MH 32 सि 9980 ही कार वरोरा भद्रावती रोडच्या टाकळी गावाशेजारी आली असता ती चार पालट्या घेत  रस्त्याच्या कडेला जाऊन पडली, या कार मधे विदेशी दारू वाहतूक होतं होती त्यापैकी अनेक दारूचे बॉक्स खाली पडले असता तिथे पौहचलेल्या नागरिकांनी दारूचा मोठा साठा पळवला, मात्र या अपघातात ड्रायव्हर वशीम लियाकत अली वय 28 वर्ष रा.खंजर वार्ड,  वर्धा हा जागीच ठार झाला तर सोबत असलेला हिंगणघाट येथील फारूक हबीब शेख हा गंभीर जखमी आहे.

या घटनेने दारू माफियांची पोलखोल झाली असून दारू वाहतूक करणारी ती स्विफ्ट डिझायर कार नेमकी कुणाची आहे हा तपास सुरू असून अज्ञात  आरोपी विरोधात कलम 279,334,304 व 184 अंतर्गत गुन्हा भद्रावती पोलिस स्टेशन मधे दाखल केला असून 90 एमएल च्या 334 ओसी दारूच्या बॉटल व कार असा एकून 3 लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी जब्त केला आहे या प्रकरणी ठाणेदार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपपोलिस निरीक्षक गजानन तेलरान्धे व हवालदार सूर हे तपास करीत आहे.