पुण्यात काम करणारे ४ युवक उपाशीपोटी तब्बल ५८ तासांच्या प्रवासानंतर पोहचले स्वगृही ◾️जि.प.सदस्य संजय गजपुरे व उमरेड चा विक्की वरघने यांनी केली मदत #COVID-19 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

पुण्यात काम करणारे ४ युवक उपाशीपोटी तब्बल ५८ तासांच्या प्रवासानंतर पोहचले स्वगृही ◾️जि.प.सदस्य संजय गजपुरे व उमरेड चा विक्की वरघने यांनी केली मदत #COVID-19

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर -पुणे जवळील चाकन येथील मर्सिडिज कंपनीत काम करणारे नागभीड तालुक्यातील बाळापुर (बुज.) येथील चार युवक कंपनीने कोरोना मुळे काम थांबविल्याने परत निघुन तब्बल ५८ तासांच्या प्रवासानंतर अखेर स्वगृही पोहचलेत. रेल्वे व बसेस बंद झाल्याने निरनिराळ्या वाहनांनी प्रवास त्यांनी या दरम्यान केला . मात्र या दरम्यान सर्वत्र सुरु असलेल्या लाॅकडाउन मुळे हा प्रवास उपाशीपोटीच करावा लागला .
        
कंपनीने काम बंद केल्यावर तिथेच वैद्यकीय तपासणी करुन सोमवारी सकाळी ७.०० वाजता पुण्याहुन निघालेल्या या चार युवकांसह गोंदिया जिल्ह्यातील दोन युवकही सोबत होते. रेल्वे व बसेस बंद झाल्याने घरच्या ओढीने या सर्व युवकांनी मिळेल त्या वाहनांनी परतण्याचा निर्णय घेतला. 

सुरुवातीला कार कंटेनरने ते पुण्याहुन निघुन औरंगाबाद पर्यंत आलेत. व तिथुन ते पोलीसांच्या मदतीने एका ट्रकने वर्धा येथे पोहचलेत. वर्धा येथुन पुन्हा ट्रकची साथ घेत मंगळवारी रात्री ७.०० चे सुमारास ते बुटीबोरीला पोहचलेत.रात्री पुन्हा सोय न झाल्याने उपाशीपोटीच रस्त्यालगतच रात्र काढली व सकाळी कोळसा ट्रकने सकाळीच ८.०० वाजता त्यातील चौघे उमरेडला पोहचलेत.

     
पण तिथुन पुढच्या प्रवासाची सोय न झाल्याने अखेर त्यांनी त्यांच्या क्षेत्रातील भाजपा जिल्हा महामंत्री व जि.प. सदस्य संजय गजपुरे यांचेशी संपर्क साधला. गजपुरे यांनी धीर देत उमरेड येथे वास्तव्यास असलेल्या विक्की वरघने यांना कल्पना देउन मदत करावयास सांगीतले. नागभीड न.प. उपाध्यक्ष गणेश तर्वेकर यांच्या या भाच्याने विलंब न लावता उमरेड येथील चौरस्त्यावर उभे असलेल्या या चारही युवकांची भेट घेउन उपाशीपोटी असलेल्या या युवकांची आधी नाश्त्याची सोय केली .
          
सकाळपासुन वाहनव्यवस्था न होऊ शकल्याने  उशीर झाल्याने दुपारी पुन्हा विक्की वरघने यांनी स्वत:चे घरुन जेवण्याची व्यवस्था केली.दरम्यान गजपुरे यांनी बाळापुर येथील कुटुंबियांशी संपर्क साधला व तेथील सामाजिक कार्यकर्ते प्रा.सचिन भोपये यांचेसह एका पालकाला वाहन घेऊन संजय गजपुरे यांनी उमरेडला रवाना केले. व अखेर सायं . ५.०० चे सुमारास हे सर्व युवक बाळापुर ला सुखरुप पोहचलेत. बाळापुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय तपासणी करुन मगच त्यांना घरी सोडण्यात आले. संकटकाळी मदत करणारे जि.प.सदस्य संजय गजपुरे व विक्की वरघने यांचे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे.