आ. मुनगंटीवार यांच्या आवाहनाला कार्यकर्त्यांचा शीघ्र प्रतिसाद : रुग्णांपासून ते पोलीस प्रशासनापर्यंत मदत कार्य सुरु : सेवा कर्मचाऱ्यांना दोन वेळेच्या भोजनाची व्यवस्था : रुग्णांच्या मदतीला चारचाकी उपलब्ध #COVID-19 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

आ. मुनगंटीवार यांच्या आवाहनाला कार्यकर्त्यांचा शीघ्र प्रतिसाद : रुग्णांपासून ते पोलीस प्रशासनापर्यंत मदत कार्य सुरु : सेवा कर्मचाऱ्यांना दोन वेळेच्या भोजनाची व्यवस्था : रुग्णांच्या मदतीला चारचाकी उपलब्ध #COVID-19

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : बल्लारपूर -


आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केलेल्या आदेशानुसार आज दि.25/03/2020 ला बल्लारपुर शहरात कोरोना वायरस सोबत सुरु असलेल्या लढाईमध्ये कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचारी, दवाखान्यातिल डॉक्टर व इतर कर्मचारि स्टाफ , नगर परिषद कर्मचारि व गरजु लोकांना भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. 

गरजू रुग्णांना दवाखान्यात जाण्या -येण्यास व रुग्णालय मधून सुट्टी झालेल्या जनतेला त्यांच्या घरापर्यंत पोहोचविन्यासाठी वाहन सेवा सुरु करण्यात आली आहे.  तीन चारचाकी वाहनांची सुविधा करण्यात आली असून मदत लागल्यास  बल्‍लारपूर शहरात भाजपाचे ज्‍येष्‍ठ नेते चंदनसिंह चंदेल 9422135686, नगराध्‍यक्ष हरीश शर्मा  8485855500 यांच्या मार्गदर्शनाखाली काशी सिंह 8975644703, आशिष देवतळे 8421611131, राजू गुंडेटी 9370322665 हे जवाबदारी सांभाळत असून  , यांच्‍याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्‍यात आले आहे.  

तसेच आज पासून बल्लारपुर पोलीस कर्मचाऱ्यांना भोजन सुविधा 31 मार्च पर्यंत रोज दिवसातुन दोन वेळा देण्यात येनार असून अधिक गरज भासल्यास ही सुविधा पुढे देखील अशीच सुरु राहिल असे आश्वासन आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी जनतेला दिले असून यावर तात्काळ अमल सुरु करण्यात आला हे महत्वाचे. 


सर्व जनतेला घरीच राहून प्रशासनाला सहकार्य करा कोरोना सोबतची ही लढाई आपन निश्चितच जिंकु असा व्यक्त केला. या मोहिम मध्ये मा.चंदनसिंह चंदेल (माजी वनविकास महामंडल अध्यक्ष)व मा.हरीश शर्मा (बल्लारपुर नगराध्यक्ष व भाजपा जिल्हाध्यक्ष)यांच्या नेतृत्वात काशी सिंग(भाजपा शहर अध्यक्ष), मनीष पांडे(भाजपा शहर महामंत्री),राजू गुंडेट्टी(भाजपा तेलगु आघाडी जिल्हाध्यक्ष), आशीष देवतळे(भाजयुमो जिल्हा महामंत्री), विक्की दूपारे,नफीस अंसारी,आशीष चावड़ा यांनी हे मदत कार्य सुरु केले आहे.