ब्रेकिंग : विदर्भात कोरोनाचा पहिला बळी #COVID-19 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ब्रेकिंग : विदर्भात कोरोनाचा पहिला बळी #COVID-19

Share This
खबरकट्टा / विदर्भ -बुलढाणा येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असलेला तरुण रूग्ण शनिवारी (28 मार्च) सामान्य रुग्णालय बुलढाणा येथील अतिदक्षता विभागात दाखल झाला. मात्र दाखल झाल्यानंतर तासाभरातच दुपारी चार वाजता त्याचा मृत्यू झाला. प्रथम दर्शनी त्याला निमोनिया असल्याचे खाजगी डॉक्टरांनी सांगितले. 

त्याच्या कोराना तपासणीसाठी मृत्यू नंतर घशातील स्त्राव नागपूर येथील प्रयोगशाळात पाठवण्यात आला होता. या तपासणीचा रिपोर्ट आज रविवारी दुपारी सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे प्राप्त झाला आहे. या रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रेमचंद पंडित यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे विदर्भातील कोरोनाचा हा पहिला बळी ठरला आहे. 

वऱ्हाडातील अकोला, वाशीम, बुलडाणा जिल्ह्यातील रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याची ही पहिलीच घटना असल्याने प्रशासन अधिक सजग झाले आहे.या रुग्णाच्या संपर्कात कोण आले होते त्या सर्वांची तपासणी तसेच रुग्ण ज्या परिसरात वावरला तो परिसर सॅनिटायझ करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.