कोरोना - मला काही होणार नाही , या भ्रमात राहू नका.. !!! #COVID-19 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

कोरोना - मला काही होणार नाही , या भ्रमात राहू नका.. !!! #COVID-19

Share This
खबरकट्टा / जाहीर आवाहन -
कोरोना विषाणूचा एकही रुग्ण चंद्रपूर जिल्ह्यात अद्यापनाही.त्यामुळे मला काहीच होणार नाही,या भ्रमात राहू नका.कोरोना विषाणूशी तुमची गाठ कुठे पडेल,याचा नेम नाही.त्यामुळे प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करा आणि अनावश्यक रस्त्यावर उतरून प्रशासनाचा ताण वाढवू नका.

तुमच्या व तुमच्या कुटूंबाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी संचारबंदी लागुकरण्यात आली आहे.त्यामुळे त्याचे तंतोतंत पालन करुन कोरोना विरुद्धचा लढा जिंकण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा.

कोरोना विषाणूने जगभरातील १८२ देशांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.त्यात महासत्ता म्हणविणाऱ्या  अमेरिका या देशाचा ही समावेश आहे.कोरोना महामारी संपूर्ण जगाला विळख्यात घेत असताना आपला निष्काळजी पणा किती घातक ठरू शकतो,हे इटलीकड़े बघितल्यानंतर स्पष्ट होईल.परिस्थिती हाता खालून निघून गेल्यानंतर उपचार करत बसण्यापेक्षा आधीच सावध राहूनकाळजी घेण्यातच जास्त शहानपणा आहे.त्यामुळे मलाकाही होणार नाही,याभ्रमात राहू नका, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रशासन तुमच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सर्वाेतोपरी प्रयत्न करीत आहे.रात्रंदिवस प्रशासनातीत अधिकारी,आरोग्य विभाग,आपतकालीन विभाग झटतो आहे.त्यामुळे प्रशासनाला सहकार्य करणे हे आपले कर्तव्यच आहे.


प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करुन घराबाहेर पडण्याचे टाळा.अत्यावश्यक असेल तरच पुरेशी काळजी घेवून बाहेर पडा.विनाकारण बाहेर जास्त वेळ फिरू नका.काम आटोपून तातडीने घरी परत या.घरात येण्यापूर्वी स्वच्छता बाळगा.हात पाय स्वच्छbधुवून घ्या तुमची एक चुक संपूर्ण कुटूंबाच्या आरोग्यावर घातक परिणाम करणारी ठरू शकते.रोग होण्यापूर्वीच रोग होणार नाही याची काळजी घेणे केव्हाही हितावह आहे.