गरजूंसाठी भोजनाची व्‍यवस्‍था हा भाजपाचा संकल्‍प ::रूग्‍णवाहीका, मेडीकल स्‍टोअर्स आदींसाठी सुध्‍दा स्‍वतंत्र व्‍यवस्‍था : भाजपाच्‍या लोकप्रतिनिधींनी आपल्‍या भागात गरजूंना मदतीचे नियोजन करावे – आ. सुधीर मुनगंटीवार* #COVID-19 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

गरजूंसाठी भोजनाची व्‍यवस्‍था हा भाजपाचा संकल्‍प ::रूग्‍णवाहीका, मेडीकल स्‍टोअर्स आदींसाठी सुध्‍दा स्‍वतंत्र व्‍यवस्‍था : भाजपाच्‍या लोकप्रतिनिधींनी आपल्‍या भागात गरजूंना मदतीचे नियोजन करावे – आ. सुधीर मुनगंटीवार* #COVID-19

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : चैत्र शुध्‍द प्रतिपदा अर्थात गुढी पाडव्‍याच्‍या शुभमूहूर्तावर चंद्रपूर आणि बल्‍लारपूर या ठिकाणी कोरोना विषाणुच्‍या पार्श्‍वभूमीवर गरजूंसाठी भोजनाची व्‍यवस्‍था करण्‍यात येईल, असा संकल्‍प भारतीय जनता पार्टीने केला असून गरजूंसाठी या दोन्‍ही शहरात 31 मार्च पर्यंत भोजनाची व्‍यवस्‍था भारतीय जनता पार्टीतर्फे करण्‍यात आल्‍याचे माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केले आहे.

सर्व नागरिकांना गुढी पाडव्‍याच्‍या शुभेच्‍छा देत कोरोना विरोधातील या लढयात आपण निश्‍चीतपणे जिंकू असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला आहे. त्‍याचप्रमाणे जिल्‍हयामध्‍ये भाजपाच्‍या प्रत्‍येक लोकप्रतिनिधींनी आपल्‍या भागात गरजूंना मदत करण्‍याच्‍या दृष्‍टीने योग्‍य नियोजन करावे व प्रत्‍येक गरजवंताला मदतीचा हात द्यावा, असे आवाहन सुध्‍दा आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

भोजनासंदर्भात जबाबदारी

भोजनासंदर्भात चंद्रपूर शहरात ब्रिजभूषण पाझारे 9850887744, राहूल पावडे 9405882788, डॉ. मंगेश गुलवाडे 9822565130, सुभाष कासनगोट्टूवार 9011144442, प्रज्‍वलंत कडू 7744899998 सूरज पेदूलवार 9403192225 यांच्‍याशी संपर्क साधावा.

तर बल्‍लारपूर शहरात भाजपाचे ज्‍येष्‍ठ नेते चंदनसिंह चंदेल 9422135686, नगराध्‍यक्ष हरीश शर्मा  8485855500 यांच्या मार्गदर्शनाखाली काशी सिंह 8975644703, आशिष देवतळे 8421611131, राजू गुंडेटी 9370322665 हे जवाबदारी सांभाळतील , यांच्‍याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्‍यात आले आहे. 

त्‍याचप्रमाणे चंद्रपूर व बल्लारपूर येथे कार्यरत 300 पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी भारतीय जनता पार्टीतर्फे भोजनाची व्‍यवस्‍था 31 मार्च पर्यंत करण्‍यात आली आहे.रूग्‍णवाहीकेसंदर्भात मदत

चंद्रपूर, बल्‍लारपूर या शहरांसह जिल्‍हयातील रूग्‍णालयांमध्‍ये रूग्‍णवाहीकेची अडचन  भासल्‍यास ब्रिजभूषण पाझारे 9850887744 यांच्‍याशी संपर्क साधावा तर सध्‍या वाहतुकीवरील निर्बंधांमुळे रूग्‍णांना सुटी झाल्‍यानंतर वाहने उपलब्‍ध होत नाहीत, अशा परिस्‍थीतीत वाहने उपलब्‍ध होण्‍यासाठी सुध्‍दा श्री. ब्रिजूभषण पाझारे यांच्‍याशी संपर्क साधण्‍याचे आवाहन करण्‍यात आले आहे.मेडीकल स्‍टोअर्स संदर्भात मदत

रूग्‍णांना औषधांसंदर्भात अडचण भासल्‍यास जिल्‍हयातील सर्वच भागात मेडीकल स्‍टोअर्सशी आवश्‍यकतेनुसार संपर्क साधाण्‍यासाठी जिल्‍हा परिषदेचे माजी अध्‍यक्ष देवराव भोंगळे 9822255932 यांच्‍याशी संपर्क साधण्‍याचे आवाहन करण्‍यात आले आहे.

कोरोना विरोधातील या लढयात भारतीय जनता पार्टीचा प्रत्‍येक कार्यकर्ता जनतेच्‍या सेवेसाठी तत्‍पर आहे. वरील व्‍यवस्‍थांचा लाभ घेण्‍यासाठी संबंधित पदाधिका-यांशी संपर्क साधण्‍याचे आवाहन आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.