खबरदारी ::आजपासून चंद्रपूर जिल्हात प्रवेशबंदी : #COVID-19 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

खबरदारी ::आजपासून चंद्रपूर जिल्हात प्रवेशबंदी : #COVID-19

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 
राज्यात कोरोना व्हायरसने बाधीत रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आता जनतेच्या सुरक्षेसाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासनाला काही कठोर निर्णय घेण्याचे निर्देश दिले असून उद्या पासून चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्व सिमा बंद करून एसटीबस, खासगी ट्रव्हल्स, टॅक्सी आदी वाहनांना जिल्ह्यात प्रवेशबंदी घातली जाणार असल्याची माहिती राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांनी आज दि.२३ मार्चला चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी बोलतांना सांगीतले. 

एक दिवस जनता कर्फ्युमध्ये जिल्हावासीयांनी सहभाग दर्शविला त्याबद्दल त्यांनी जनतेचे आभार मानले मात्र आता मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र लॉकडाऊन केला असल्यामुळे येत्या ३१ मार्चपर्यंत जनतेनी घराबाहेर पडू नये, स्वताची काळजी घ्यावी, स्वच्छता राखावी असे आवाहन वडेट्टीवार यांनी केले. 

आज दि.२३ मार्चला पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेण्यासाठी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व प्रमूख अधिकार्‍यांच्या बैठका घेतल्या. यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

चंद्रपूर जिल्ह्यात सध्या स्थितीत एकही कोरोना पॉझीटीव्ह रूग्ण नाही मात्र होम कॉरंन्टाईन करण्यात आलेली अनेक जण आहे.त्यातील जवळपास ४२ लोकांना प्रीझेंटीव्ह म्हणून प्रशासन त्यांना ताब्यात घेऊन चंद्रपुरातील वनअकादमी येथील होस्टेलमध्ये प्रत्येकांना स्वतंत्र खोलीत विलगीकरण करून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.यात चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील ३५ , ग्रामिण भागातील ४ तर तालुकास्तरावरील ३ जणांचा समावेश आहे. 

चंद्रपूर येथील आयएमए या वैद्यकीय संघटनांसोबत प्रशासनाने मिटींग घेतली आहे. त्यांचेकडूनही प्रशासनाला आवश्यक ते सर्वोतोपरी मदत मिळणार आहे, अशी माहिती पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांनी दिली. कोरोना व्हायरसच्या विषाणूंचा संसर्ग ही आता राष्ट्रीय आपत्ती आहे. त्यामुळे प्रशासनाकडून देण्यात येत असलेल्या सूचनांचे नागरिकांनी पालन करावे, प्रशासनाचा कुठलाही निर्णय हा जनतेच्या गैरसोयीसाठी नसून जनतेच्याच सुरक्षेसाठी आहे. जनतेला वाचविण्यासाठी आहे. त्यामुळे प्रशासनाच्या निर्णयांना कोणीही सक्ती समजू नये असे आवाहन करीत चंद्रपूर जिल्हा प्रशासनाचे काम अभिनंदनिय असे आहे अश्या शब्दात वडेट्टीवार यांन प्रशासनाच्या कार्यावर समाधान व्यक्त केले. 

राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अतिशय गांभीर्याने या समस्येवर लक्ष घातले आहे. आपत्ती व्यवस्थापन विभगााकडून ४५ कोटी रूपये देण्यात आले आहेत. पुन्हा गरज भासल्यास निधी देण्यात येईल असा विश्वासही वडेट्टीवार यांनी बोलून दाखविला.