भाडेकरूकडून भाडे न घेण्याचे जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांनी दिले निर्देश #COVID-19 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

भाडेकरूकडून भाडे न घेण्याचे जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांनी दिले निर्देश #COVID-19

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले असून भारतातही त्याचे पडसाद पाहावयास मिळत आहे. त्यामुळे देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

असे असतांना कोणाच्याही हाताला काम नाही अशातच पैशाची आवक येणे बंद झाली आहे. त्यामुळे सध्याची स्थिती बघता कोणत्याही घरमालकाने  भाडेकरूला घराबाहेर काढू नये आणि महिनाभराचे घरभाडंही घेऊ नये असे निर्देश चंद्रपूर चे जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांनी  दिले. 


गावपातळीपर्यंत या निर्देशाचे पालन व्हावे आणि ज्यांनी याचा भंग केला त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असेही जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांनी म्हटले  आहे. घरमालकांकडून भाडेकरूंना घरभाडे मागितले जात असेल किंवा घर रिकामे करून मागितले जात असेल, तर त्याची स्थानिक प्रशासनाकडे तक्रार करावी, असे  आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.