संकटकाळी ग्रामपंचायतचा १४ वा वित्त आयोग निधी गावातील गरजू लोकांसाठी खर्च करण्याची परवानगी देण्यात यावी - आशिष देरकर गावातील राशन कार्ड नसणाऱ्या लोकांनाही धान्य देण्यात यावे #COVID-19 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

संकटकाळी ग्रामपंचायतचा १४ वा वित्त आयोग निधी गावातील गरजू लोकांसाठी खर्च करण्याची परवानगी देण्यात यावी - आशिष देरकर गावातील राशन कार्ड नसणाऱ्या लोकांनाही धान्य देण्यात यावे #COVID-19

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : कोरपना -



चौदावा वित्त आयोगाचा निधीची दुसरी किस्त सुदैवाने चंद्रपूर जिल्ह्यात एक महिना आधी प्राप्त झाली. त्यामुळे हा निधी ग्रामपंचायतींकडे अंदाज पत्रकानुसार कामे करण्याकरिता शिल्लक आहे. मात्र देशात संचारबंदी सुरू असल्यामुळे ग्रामपंचायतींची सर्व कामे बंद आहे. 

अशावेळी संपूर्ण देशासमोर संकट उभे असताना ग्रामपंचायतीकडे उपलब्ध असलेला हा निधी संकटकाळी गावातील गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तू पुरविण्याकरिता वापरण्याची परवानगी शासनाने प्रत्येक ग्रामपंचायतीला द्यावी. त्यासंदर्भात निकष तयार करावे. जेणेकरून स्थानिक पातळीवर अनेक समस्या सोडविण्यास मदत होईल.
        
जिल्ह्यातील राशन कार्ड नसणाऱ्या प्रत्येक गरीब कुटुंबाला धान्य देण्यात यावे. किंवा 14 वा वित्त आयोग निधी मधून धान्य खरेदी करून लोकांना वितरित करता यावे, सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांना शासकीय दराने अनाज उपलब्ध करून द्यावे. 

धान्याची रक्कम   चौदावा वित्त आयोग निधीतून करण्याची परवानगी देण्यात यावी याकरिता स्मार्ट व्हिलेज बिबीचे उपसरपंच आशिष देरकर यांनी जिल्हाधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे. सध्या विकासकामांचा विचार न करता प्रत्येक सरपंचांनी ही मागणी लावून धरावी असे आवाहन आशिष देरकर यांनी केले.