उत्पादनाच्या लालसेने वेकोलि प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या आरोग्याशी खेळू नये -जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनील उरकुडे ह्यांचा वेकोलि प्रशासनाला इशारा #COVID-19 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

उत्पादनाच्या लालसेने वेकोलि प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या आरोग्याशी खेळू नये -जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनील उरकुडे ह्यांचा वेकोलि प्रशासनाला इशारा #COVID-19

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा (प्रतिनिधी ) 


कोरोना आजाराच्या जीवघेण्या संसर्गामुळे आज सारे जग चिंताक्रान्त आहे. भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशात संपर्कामुळे हा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरण्याचा धोका लक्षात घेता केंद्र व राज्य शासन विविध उपाययोजना करत आहे. शासकीय कार्यालयासोबत अनेक औद्योगिक कारखानेही बंद करण्यात आले. 

रेल्वे सारखे प्रचंड उलाढाल असलेले क्षेत्र ही केंद सरकारने बंद केले असून लोकांचा सार्वजनिक संपर्क आटोक्यात येण्याकरता पूर्ण प्रयत्न केले जात असताना वेकोलि प्रशासनाने मात्र अट्टाहासाने आपले उत्पादन चालूच ठेवले असून कर्मचाऱ्यांच्या आरोग्याकडेही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्या जात आहे. 

मास्क,  स्यानिटायझर, हॅन्ड वॉश केंद्र  ह्यासारख्या कुठल्याहि सुविधा न देता  कर्मचाऱ्यांना काम करण्यास बाध्य केले जात असून वेकोलि खाणीमधील कर्मचाऱ्यांची संख्या लक्षात घेता तिथे संसर्ग होण्याची शक्यता अधिक आहे. 


तरीही वेकोलि प्रशासनाने आपला उत्पादन उदिष्ठ गाठण्याचा अट्टाहास कायम ठेवला असून हा वेकोलि कर्मचाऱ्यांच्या आरोग्याशी व जीविताशी खेळण्याचा प्रकार असून वेकोलि प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या आरोग्याशी खेळू नये व ह्यासंदर्भात त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनील उरकुडे ह्यांनी केली आहे.