सांतापजनक ! : रशियातून येऊन विनचाचणी चंद्रपुरात मुक्त संचार ! उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या दोन व्यक्तींकडून निष्काळजीपणा : प्रशासनाशी हुज्जत - वेकोलिच्या विश्रामगृहात बंदिस्त : कोरोना चाचणी झाल्यावरच सुटका -तोपर्यंत विलगीकरणात #COVID-19 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

सांतापजनक ! : रशियातून येऊन विनचाचणी चंद्रपुरात मुक्त संचार ! उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या दोन व्यक्तींकडून निष्काळजीपणा : प्रशासनाशी हुज्जत - वेकोलिच्या विश्रामगृहात बंदिस्त : कोरोना चाचणी झाल्यावरच सुटका -तोपर्यंत विलगीकरणात #COVID-19

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : जगभरात कोरोना विषाणू संसर्गाची दहशत सुरु असून चीन मध्ये जन्मलेल्या या विषाणूने जगाला विळख्यात घेतले आहे. प्रथम चीन च्या संपर्कात येऊन अनेक राष्ट्रांत याचा प्रसार होऊन विदेशातून येणाऱ्या प्रवाशी - नागरिकांमुळे हा विषाणू भारतात संसर्गित होऊन आतापर्यंत देशभरात मृतकांची संख्या 7 वर गेली असताना विदेशातील आवक - जावक संपर्क पूर्णतः बंद असून जवळजवळ सर्वच प्रवाशी व मालवाहक विमाने व समुद्री जहाजांना स्थागिती देऊन थांबविण्यात आले आहे. 

कोविड -19 चा भारतात अतिशय वेगाने प्रादुर्भाव होत असताना महाराष्ट्र सीमांसहित बंद करण्यात आला असून विदेशातून आलेल्या प्रत्येकाची कसून तपासणी होत असताना चंद्रपुरात मात्र रोज धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. कालच पुण्याहून आलेल्या प्रवाश्याना खाजगी ट्रॅव्हल्स कडून विनतपासणी सोडून देण्यात आल्याची घटना उघडकीस आल्याने त्यांचा शोध घेता घेता प्रशासनाची दमछाक झाली.त्यानंतर काल सायंकाळी  रशिया येथून चंद्रपुरात दाखल झालेल्या दाम्पत्य विनातपासणी फिरत असल्याचे नागरिकांच्या लाक्षत आल्याने शहरात एकच खळबळ उडून प्रशासनाची झोप उडाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 
माहिती नुसार रशिया येथून वडगाव चंद्रपुर येथे दाखल झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला समजताच समजताच संपर्क केला असता प्रशासनासोबत हुज्जत घालणाऱ्या या दोघांना रविवारी पोलिसांनी वडगाव येथून तात्काळ विलगीकरन करून वेकोलिच्या विश्रामगृहात बंदिस्त ठेवले आहे. या दोघांचीही करोना चाचणी केली जात असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी दिली असून नागरिकांना घाबरण्याचे काहीही कारण नसून फक्त चाचणी रिपोर्ट येतपर्यंत यांना देखरेखीत ठेवण्यात येणार असल्याचे कळविले आहे.
रशिया येथून चंद्रपुरात दाखल झालेल्या या उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या एका कुटुंबातील महिला व पुरुषाने जिल्हा प्रशासनापासून ते विदेशात गेले होते ही माहिती एक आठवडा लपवून ठेवली. 16 मार्चला संबंधित व्यक्ती व महिला भारतात परत आले. त्यानंतर ते नागपूर व चंद्रपूरला परत आल्यावर त्यांनी स्थानिक प्रशासनाला कोणतीही माहिती न देता शहरात, विविध ठिकाणी भेटी घेत फिरत होते. 

विदेशातून आलेल्या व्यक्तींनी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी केल्यानंतरही या व्यक्तीने माहिती लपवून ठेवली आणि वडगाव येथील एका निवासस्थानी लपून बसले. विशेष म्हणजे, या सात दिवसात हा व्यक्ती समाजात सर्वत्र वावरत होता हे गंभीर आहे.