अबब! कोरोनाच्या चाचणीसाठी मोजावे लागणार तब्बल ४५०० रुपये, शासनाचे निर्देश #COVID-19 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अबब! कोरोनाच्या चाचणीसाठी मोजावे लागणार तब्बल ४५०० रुपये, शासनाचे निर्देश #COVID-19

Share This
खबरकट्टा / थोडक्यात -देशात कोरोनाचे आत्तापर्यंत एकुण ३१४ रुग्ण सापडले आहेत. आता हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशात कोरोनाची चाचणी करुन घेण्यासाठी नागरिकांना तब्बल ४५०० रुपये मोजावे लागणार आहेत.
इंडियन काऊंन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने खाजगी दवाखान्यांना कोरोनाची चाचणी करण्याची परवानगी दिली आहे. मात्र कोरोना चाचणीसाठी जास्तीत जास्त ४५०० रुपये आकरता येतील असे निर्देश ICMR ने शासनातर्फे खाजगी दवाखाण्यांना दिले आहेत.दरम्यान, कोरोनाची चाचणी मोफत किंवा अगदी माफक दरात असावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे. रविवारी सरकारकडून जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. देशात सर्वत्र कडकडीत बंद पहायला मिळत आहे.


चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 9518772820 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.