कोरोना विषाणूच्या विरोधातील लढ्यात प्रशासनासह आ.किशोर जोरगेवार व यंग चांदा ब्रिगेड ची चमू मैदानात : घरोघरी फिरून कोरोना संसर्गाबद्दल जनजागृती : मास्क, साबण, सॅनिटायझर चेही वाटप #COVID-19 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

कोरोना विषाणूच्या विरोधातील लढ्यात प्रशासनासह आ.किशोर जोरगेवार व यंग चांदा ब्रिगेड ची चमू मैदानात : घरोघरी फिरून कोरोना संसर्गाबद्दल जनजागृती : मास्क, साबण, सॅनिटायझर चेही वाटप #COVID-19

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

आ. किशोर जोरगेवार यांच्या आदेशानुसार आजपासून यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शहरातील विविध भागात जाऊन  महत्त्वाच्या टिप्स तसेच आवश्यक खबरदारी व उपाययोजना घेण्यासाठी  कोरोना विषाणू संबंधी  महत्त्वाचे माहिती पत्रक, मास्क, साबण, सॅनिटायझर चे घरोघरी व गर्दीचे ठिकाणी वाटप सुरू केले आहे तसेच प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले, त्यांच्या या उपक्रमाची दखल प्रशासनाने घेतली असून जिल्हाधिकारी श्री. कुणाल खेमनार यांची या जनजागृती उपक्रमाचे कौतुक केले.
     
कोरोनाचे संकट काळजी वाढवणारे आहे. आपल्या सर्वांना आपली, आपल्या कुटुंबाची आणि समाजाची काळजी घ्यावी लागणार आहे. मला काही होणारच नाही, ही कल्पना खोटी ठरू शकते. स्वत:पासून काळजी घ्यायला सुरु करा, आपल्या कुटुंबाची आणि समाजाचीही काळजी घ्या. आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडूच नका. सोशल डिस्टन्शिंग कटाक्षानेे पाळा. सरकारने केलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्याची स्वयंशिस्त आण सर्वांनी पाळली पाहिजे. आपण सर्व सामूहिक पद्धतीने काळजी घेऊन, जागरुक राहून कोरोनाच्या या संकटाचा मुकाबला करू या, कोरोनाला हरवूया.