खबरकट्टा / 31 मार्च 2020-
काल (30 मार्च ) रात्री चंद्रपुरातील एका रुग्णाला मेयो नागपूर येथे कोरोना तपासणी करीता नेण्यात आले असता त्याचा अवघ्या दोन तासातच मृत्यू झाल्याची वार्ता येताच सर्वांची भांबेरी उडाली होती.
परंतु आज सकाळी या रुग्णाची तपासणी रिपोर्ट नेगेटिव्ह आला असल्याचे अत्यंत दिलासादायक वृत्त आहे. चंद्रपुरात एकही कोरोना बाधित रुग्ण नाही -तरीही खबरदारी घेत शासनाच्या नियमांचे पालन करण्याची गरज आहे.
क्लिक करा - नक्की वाचा : कोरोना - मला काही होणार नाही , या भ्रमात राहू नका.. !!! #COVID-19
------------------------------------------------------
खबरकट्टा /चंद्रपूर : वृत्त साभार (lokmat.com)-30 मार्च 2020-
CoronaVirus : चंद्रपुरातील कोरोना संशयित रुग्णाचा नागपुरात मृत्यू ! Suspected coronary patient dead in Nagpur proper from Chandrapur district.
एका खासगी हॉस्पिटलमधून कोरोना संशयित म्हणून मेयोमध्ये दाखल केलेल्या रुग्णाचा दोन तासातच मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. या रुग्णाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.विशेष म्हणजे हा व्यक्ती चंद्रपुरातील असून गेले पाच दिवस नागपूर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये भरती होता.

वृत्त : UCN-Nagpur (30 मार्च 2020)
एका खासगी हॉस्पिटलमधून कोरोना संशयित म्हणून मेयोमध्ये दाखल केलेल्या रुग्णाचा दोन तासातच झाल्याने खळबळ उडाली. या रुग्णाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. सर्वांनाच अहवालाची प्रतीक्षा आहे.
या रुग्णासह नागपुरात रुग्णाची संख्या १६ झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर येथील ५५ वर्षीय व्यक्ती गेल्या पाच दिवसांपासून एका खासगी हॉस्पिटलमध्ये भरती होता. डॉक्टरानुसार रुग्णाला सर्दी, खोकला व दम लागत होता. त्याचे सिटिस्कॅन केले असता न्युमोनिया असल्याचे दिसून आले. ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’च्या (आयसीएमआर) सुधारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार सर्व न्युमोनिया रुग्णांची चाचणी करण्याचा सूचना आहेत. त्यानुसार या रुग्णाच्या चाचणीसाठी सोमवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास मेयोला आणले. रुग्णाला वॉर्ड क्र. ४ मध्ये दाखल करण्यात आले. परंतु दोन तासातच त्याचा मृत्यू झाला.
कोरोना संशयित रुग्णाच्या मृत्यूने सर्वांनाच नमुन्याचा काय अहवाल येतो, याची प्रतीक्षा लागली आहे.प्राथमिक माहितीत हा रुग्ण चंद्रपूर येथील असल्याचे सांगण्यात येत असून चंद्रपूर शहरातील रहमत नगर येथील सेठ नामक मोठा भंगार व्यापारी असून गेल्या आठवड्याभरापूर्वी दिल्लीहुन प्रवास करून आल्याचे चर्चेत आहे.