चिमुर येथील श्रीहरी बालाजी मंदिर उद्या बुधवार पासून भाविकानसाठी बंद, ;सहायक धर्मादाय आयुक्तांचा आदेश #corona maharastra lockdown #COVID-19 #Corona virus #corona effect #shrihari balaji - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चिमुर येथील श्रीहरी बालाजी मंदिर उद्या बुधवार पासून भाविकानसाठी बंद, ;सहायक धर्मादाय आयुक्तांचा आदेश #corona maharastra lockdown #COVID-19 #Corona virus #corona effect #shrihari balaji

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : चिमुर प्रतिनीधी 

      
चिमुर येथील प्रसिद्ध श्रीहरी बालाजी मंदिर दिनांक 18  बुधवार पासून मा, सहायक आयुक्त चंद्रपुर यांच्या आदेशनवये भाविकांसाठी पुढील आदेश येई पर्यन्त बंद करण्यात येत आहे.
           
संपूर्ण  जगात  तांडव घालणाऱ्या कोरोना व्हायरसने भारतातही धुमाकुल घातला आहे, महाराष्ट्रात सुधा कोरोनाचे रुग्ण आढळल्यामुळे कोरोनाचा फैलाव रोखन्यासाठी केंद्र सरकार व राज्य शासनाने सर्व खबरदारी घेण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत, याच पाशर्वभूमीवर चिमुर येथील श्रीहरी बालाजी मंदिर बुधवार पासून बंद राहणार आहे.

      
महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी चंद्रपुर यांचे निर्देशानुसार सहाय्यक धर्मादाय आयुक्त चंद्रपुर यांचे सूचनेनुसार दिनांक 18 मार्च बुधवार पासून भाविकांकरीता मंदिर बंद करण्यात येत आहे, त्यांच्प्रमाणे सहाय्यक धर्मादाय आयुक्त चंद्रपुर  यांचे भाविकांना दर्शनाकरिता मंदिर पूर्ववत सुरु ठेवन्याचे आदेश प्राप्त होताच भाविकाना करिता सुरु करण्यात येईल,
       
भाविकाना होत असलेल्या आसुविधेबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करीत आहो भविकनी आम्हाला सहकार्य करावे असी विनंती श्रीहरी बालाजी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष डॉ, मंगेश भलमे, विश्वस्त सुरेश पाटिल डाहूले, चंद्रकांत भोपे, नीलम राचलवार, डॉ, दीपक यावले, बबनरावजी बोथले यानी केले आहे.