Corona Effect in INDIA : ग्रामीण भागातील शाळा बंद ठेवण्याचा उल्लेख परिपत्रकात नसल्याने खेड्यापाड्यात संभ्रम : राज्यातील शाळा, महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद ! - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

Corona Effect in INDIA : ग्रामीण भागातील शाळा बंद ठेवण्याचा उल्लेख परिपत्रकात नसल्याने खेड्यापाड्यात संभ्रम : राज्यातील शाळा, महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद !

Share This
डॉ. प्रदीप व्यास, प्रधान सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य यांनी साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 मधील खंड 2, 3, 4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित करून  महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत हद्दीतील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे  14 मार्च 2020 ला आदेश जारी केले आहे. हा सर्व भाग शहरी येतो. ग्रामीण भागातील शाळा बंद ठेवण्याचा उल्लेख या परिपत्रकात नसल्याने खेड्यापाड्यातील शाळा सुरु राहतील, अशी चर्चा शिक्षण विभागात सुरु आहे.
राज्यातील शाळा, महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद : 


खबरकट्टा / महाराष्ट्र :  राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या २२ वर पोहोचली असून, या विषाणूचे संक्रमण वेगाने होत असल्याने राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये हे ३१ मार्च २०२० पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. तसा प्रस्ताव राज्याच्या आरोग्य खात्याने शिक्षण विभागाला पाठविला होता.


त्याला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या शिवाय, शैक्षणिक, धार्मिक, क्रीडा, राजकीय जाहीर कार्यक्रमांची परवानगीही रद्द करण्यात आलेली आहे. शिक्षण विभागाच्या पत्रकानुसार, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून राज्यातील सर्व महानगरपालिका, सर्व नगरपालिका आणि सर्व नगरपंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी आणि खासगी शाळा व महाविद्यालये हे ३१ मार्च २०२० पर्यंत बंद ठेवण्याचे याद्वारे सूचित करण्यात येत आहे. या सर्व शाळांतील इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा तसेच विद्यापीठाच्या परीक्षा वेळापत्रकानुसार घेण्यात येणार आहेत.


परंतु जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागात मोठमोठी शाळा -कॉन्व्हेंट आहेत. तिथे शिकणारे बहुतांशी विद्यार्थी हे महानगर, नगर पंचायत परिसरातून शिक्षण घेण्यास जातात. चंद्रपूर महानगर च्या आजूबाजूला ग्रामीण भागातही अशी अनेक कॉन्व्हेंट आहेत तसेच अनेक नगर परिषदा. नगर पंचायतींच्या हद्दीबाहेर ग्रामीण भागात सुद्धा मोठी विद्यार्थी संख्या असलेली शाळा कॉन्व्हेंट आहेत. ती बंद ठेवण्याचेही आदेश आहेत काय या बाबत खुद्द मुख्यध्यापका पासून विध्यार्थ्यांच्या पालकांत संभ्रम आहे. 
त्याचप्रमाणे आजारी विद्यार्थी इतर विद्याथ्र्यांच्या संपर्कात येणार नाही, यासाठी आवश्यक ती दक्षता आणि खबरदारी घेण्याच्या सूचना संबंधित संस्था प्रमुखास देण्यात याव्यात, असेही या परिपत्रकात नमूद आहे. सोमवारपासून या आदेशाची अमलबजावणी केली जाणार आहे. शाळांसोबतच अंगणवाड्या आणि आयटीआय अभ्यासक्रमही बंद ठेवण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. 

जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी जारी केलेल्या 14मार्च 2020 च्या  आदेशानुसार, महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत हद्दीतील शाळा, महाविद्यालये बंद ठेवली जाणार आहेत. हा सर्व भाग शहरी येतो. ग्रामीण भागातील शाळा बंद ठेवण्याचा उल्लेख  सुद्धा या  परिपत्रकात नसल्याने खेड्यापाड्यातील शाळा सुरु राहतील, अशी चर्चा शिक्षण विभागात सुरु होती.