चंद्रपूर ब्रेकिंग : मायलेकांची थेट तुरुंगात रवानगी : जमाव करून पोलिसांशी हुज्जत : ताब्यात घेऊन विविध कलमांती अटक : जिल्हा सत्र न्यायालयानेही नाकारला जामीन #Chandrapurpolice - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर ब्रेकिंग : मायलेकांची थेट तुरुंगात रवानगी : जमाव करून पोलिसांशी हुज्जत : ताब्यात घेऊन विविध कलमांती अटक : जिल्हा सत्र न्यायालयानेही नाकारला जामीन #Chandrapurpolice

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 


कोरोनाच्या पार्श्वभुमिवर एकीकडे चंद्रपूर पोलीस प्रशासन जीवाचे रान करुन शहरातील रस्त्यारस्त्यावर उन्हातान्हात उभे राहून कडक पहारा देत आहेत.पंतप्रधानांच्या आवाहनानंतर ‘सोशल डिस्टंस’ रहावे म्हणून नागरिकांना घराबाहेर न निघण्याचे आवाहन पोलीस करीत आहेत. 

तर दुसरीकडे कोरोनासारख्या प्राणघातक विषाणूला गंभीरपणे न घेता व कुठलेही अतिविशेष काम नसतांना देखील नागरिक घराबाहेर पडायला रस्त्यावर येत आहेत. संपुर्ण देशात २१ दिवसाची जनसंचारबंदी जनतेच्या स्वास्थासाठी, व कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये याकरीता नागरिकांनी सरकारला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाप्रशासन व पोलिस विभागाकडून वारंवार केल्याजात आहेत.

या संचारबंदीला न जुमानता काही हुडदंड नागरिक चक्क पोलीसांना केराची टोपली दाखविण्याचा प्रयत्न करीत आहेत.संचारबंदीची खिल्ली उडवून धन्यता मानत असल्याचे दिसताहेत. दरम्यान असाच एक प्रकार चंद्रपूर शहरातील ताडोबा रोडवरील तुकूम परिसरात घडला असून, तेथील रस्त्यावर काही लोकांचा जमाव झाला असल्याची माहिती स्थानिक गुन्हेशाखेचे सहायक पोलिस निरीक्षक जितेंद्र बोबडे यांना कळताच त्यांनी एएसआय पंडित व हाटे, पोलीस हवालदार सुरेश केमेकर, नदीम पठाण, संजय आदकुलवार, अनुप डांगे, नितीन रायपुरे व अमोल यांनी पोलीस ताफ्यासह घटनास्थळ गाठून जमाव हटविण्यासाठी गेले.त्या जमावातील तनदशी खान राजा वय (२६) व त्याची आई नजमा खान राजा आझाद चौक, तुकुम  यांनी बंदोबस्तात असलेल्या पोलिसांना शिवीगाळ करून त्यांचे सोबत हुज्जत घातली व लोकांचा जमाव केला तसेच शासकिय कामात अडथळा निर्माण केला या कारणावरुन त्यांचे विरुद्ध भादवि कलम ३५३, ३३२, ४२७, १८६ , १८८, २६९, २९४, ५०६, ३४ त्याचप्रमाणे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन सहकलम ५१ (ब) ,३७ (३) व १३५ म.पो.का.अन्वये रामनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. 


जिल्ह्यात संचारबंदी असल्यामुळे जिल्हा सत्र नायालयाने  या दोन्ही आरोपींची जमानत नाकारल्याने त्यांची चंद्रपूर जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली असल्याचे रामनगर पोलीस ठाण्यातील  वरिष्ठ पोलीस निरिक्षक प्रकाश हाके यांनी माहिती दिली .