रंगपंचमी नंतर अंघोळीला गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू :chandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

रंगपंचमी नंतर अंघोळीला गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू :chandrapur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : पोंभुर्णा -

रंगपंचमीचा गुलाल उधळण करुण नदीवर आंघोळीला गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज  दिनांक १० ला सायंकाळी पाच  चे  सुमारास पोभूर्णा  तालुक्यातील  कवटी येथे घडली.


मृतकाचे  नाव  अखिल दिवाकर  कामीडवार वय २७ असे आहे. ते  पोभूर्णा  तालुक्यातील  कवटी  येथील मूळचे  रहिवासी असुन  मागील काही दिवसानपासून  ते  पोभूर्णा  येथे  किरायाने  रहात  असून  आज  धूळवड साजरी करुन  अखिल आपल्या काही मित्रासह येथील अंधारी नदी पात्रात (भीम कुंड जवळ )आंघोळीला  गेला  होता.खोल  पाण्याचा  अंदाज  न  आल्याने  बुडून  मृत्यू झाला. त्याचा  पच्छात  आई  वडिल  व  बहीण  आहे पोभूर्णा  पोलिसांनी  अकस्मात मृत्यू ची  नोद  केली  असून  मर्म  दाखल  केलं  आहे.