विद्यार्थीनीशी अश्लील संभाषण : शिक्षकाला अटक #chandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

विद्यार्थीनीशी अश्लील संभाषण : शिक्षकाला अटक #chandrapur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 




तालुक्यातील केळझर येथील आनंद विद्यालयात कार्यरत शिक्षकाला विद्यार्थिनीशी भ्रमणध्वनीवरून अश्लील संभाषण केल्याप्रकरणी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. बंडू कवडू चापडे (५०) असे आरोपी शिक्षकाचे नाव असून, शिक्षकाच्या या कृत्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. 



विद्यालयातील इयत्ता ११ वीत शिकत असलेल्या पीडित विद्यार्थिनीला आरोपी शिक्षक वारंवार भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून मूल येथे येण्यासाठी आग्रह करीत होता. तसेच अश्लील संवादही साधायचा मागील चार-पाच दिवसांपासून सतत हा प्रकार सुरू असल्याने त्रस्त झालेल्या पीडित विद्यार्थिनीने शनिवारी सायंकाळी मूल पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी भादंवि कलम ३५४ (ड), पोस्को कलम १२, ५०४ अन्वये गुन्हा दाखल करून रविवारी सकाळीच आरोपी शिक्षकाला त्याच्या राहत्या घरून अटक केली. 


विद्यार्थिनीशी अश्लील संवाद साधून या शिक्षकाने गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा फासल्याने आरोपी शिक्षकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान आरोपी शिक्षकाची चंद्रपूर कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार सतीशसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक वनमाला पारधी करीत आहेत.